cctv Dainik Gomantak
गोवा

Curti Khandepar Panchayat : कचरा फेकणाऱ्यांवर 26 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ; 5 जणांवर कारवाई

सीसीटीव्हीमुळे रस्त्यालगत कचरा टाकण्याचे प्रमाण ८० टक्के कमी करण्यात पंचायत मंडळाला यश आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : फोंडा, कुर्टी खांडेपार पंचायत क्षेत्रात कचरा फेकणाऱ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी २६ सीसीटीव्ही कॅमेरे यापूर्वी बसविण्यात आले आहे.या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कचरा फेकणाऱ्या पाच जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.या पुढेही कचरा फेकणाऱ्यांना कुर्टी खांडेपार पंचायत दंड ठोठावणार आहे.

कुर्टी खांडेपार सरपंच सौ.संजना नाईक यांनी सांगितले की, लवकरच खांडेपार येथील महत्वाच्या पुलावर सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. नवीन व जुन्या पुलावर सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्यास दूधसागर नदीत कचरा टाकणारे कॅमेऱ्यात कैद होणार आहेत.

तसेच खांडेपारच्या दोन्ही पुलांवरून येजा करणाऱ्या वाहनांवर करडी नजर सीसीटीव्ही ठेवणार आहे.कुर्टी पंचायत क्षेत्रात मागील पंचायत मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविली होते.

त्यानंतर नवीन पंचायत मंडळाने अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कचरा टाकत असल्याने सीसी टीव्ही कॅमेरे बसवून कचऱ्यावर नियंत्रण मिळविले आहे. सध्या पंचायत क्षेत्रात २६ कॅमेरे बसविले असून त्यापैकी एकाची अज्ञाताने तोडफोड केली आहे, तर अन्य एक कॅमेऱ्याची अज्ञाताने चोरी केली आहे.

पंचायततर्फे फोंडा पोलिस स्थानकात यापूर्वीच अज्ञातांविरोधात तक्रार दिली आहे. सीसीटीव्हीमुळे रस्त्यालगत कचरा टाकण्याचे प्रमाण ८० टक्के कमी करण्यात पंचायत मंडळाला यश आले आहे.

पंच सदस्य हरीश नाईक यांनी पंचायत क्षेत्रात यापूर्वी अनेक ‘ब्लॅक स्पॉट’ निश्‍चित केले होते. अनेक लोक वाहनांतून कचरा रस्त्यालगत टाकून जात होते. परंतु सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यानंतर ८० टक्के कचरा टाकण्याचे प्रकार बंद झाले आहेत.

पंचायत मंडळाने ४ महिन्यांपूर्वी खांडेपार पुलावर दोन सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेऊन प्रक्रिया सुरु केली होती. लवकरच दोन्ही पुलांवर महिन्यात कॅमेरे येणार आहेत.

तसेच सावित्री हॉल जवळ कॅमेरा बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे,असे पंच हरीश नाईक यांनी सांगितले.

सीसीटीव्हीबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार !

फोंडा पोलिस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी सांगितले,की बाणस्तारी येथे ऑगस्ट महिन्यात झालेल्या भीषण अपघातानंतर पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज शोधताना तारांबळ उडाली होती

त्यामुळे पुन्हा असा प्रकार होऊ नये, यासाठी आपण उपजिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करणार आहोत. पंचायत क्षेत्रात येणाऱ्या सर्व पुलांवर सीसीटीव्ही बसवण्यासाठी पंचायत मंडळाने पुढाकार घ्यावा,

अशी सूचना करावी,तालुक्यातील सर्व पंचायतींना सीसीटीव्ही बसविण्याचा आदेश देण्यात यावा, असे पत्रात नमूद करणार आहे.त्यामुळे लवकरच बोरी, खांडेपार, आमोणा, बाणास्तारी व अन्य महत्वाच्या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT