Valpoi Redeghat Road Garbage Issue Dainik Gomantak
गोवा

Valpoi: रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य! म्हाऊस पंचायतीचे दुर्लक्ष

Valpoi Redeghat Road Garbage Issue: परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: म्हाऊस पंचायत क्षेत्रातील नागवे येथे वाळपई-रेडेघाट रस्त्यालगत वारंवार मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला जात आहे. सध्या या परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून येथून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

वाळपई-होंडा मुख्य रस्त्याच्या बाजूला रेडेघाट येथे अज्ञात व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जात आहे. या कचऱ्यामुळे हा परिसर गलिच्छ बनला आहे. या कचऱ्यामधील खाद्यपदार्थ खाण्यासाठी भटकी कुत्री, मोकाट जनावरे या भागात ठाण मांडून बसतात. त्यामुळे अपघातांचा धोका नाकारता येत नाही.

तसेच या परिसरात दुर्गंधी पसरल्याने रस्त्यावरून ये-जा करताना प्रवाशांना नाक दाबून धरावे लागते.

या ठिकाणी अनेकवेळा कचरा फेकला जातो. नंतर पंचायत ही जागा स्वच्छ करते. मात्र, काही दिवसांनी पुन्हा हीच स्थिती निर्माण होते. त्यामुळे या ठिकाणी कचरा फेकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

फलक, ‘सीसीटीव्ही’ची मागणी

वाळपई पालिका व म्हाऊस पंचायतीतर्फे दररोज घरोघरी कचरा उचलण्याची सोय केली आहे. तरीही काहीजण घरातील व अन्य कचरा याठिकाणी फेकतात. या ठिकाणी पंचायतीतर्फे कचरा फेकू नये यासंबंधीचा फलक तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशी मागणी म्हाऊसच्या ग्रामसभेत अनेकदा केली आहे. तसे आश्वासनही पंचायतीने दिले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही.

म्हादई नदीत प्रदूषण

फलक, ‘सीसीटीव्ही’ची मागणी: वाळपई पालिका व म्हाऊस पंचायतीतर्फे दररोज घरोघरी कचरा उचलण्याची सोय केली आहे. तरीही काहीजण घरातील व अन्य कचरा याठिकाणी फेकतात. या ठिकाणी पंचायतीतर्फे कचरा फेकू नये यासंबंधीचा फलक तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसवावा, अशी मागणी म्हाऊसच्या ग्रामसभेत अनेकदा केली आहे. तसे आश्वासनही पंचायतीने दिले. मात्र, अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT