Gang of three ladies arrested in South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa Wine Shop Robbery: वास्कोत वाईन शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न, महिलांची टोळी रेड हँड अटक

वाईन शॉपमध्ये चोरीच्या प्रयत्नात तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

Pramod Yadav

Gang of three ladies arrested in South Goa: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वास्को पोलिसांनी सीसीटीव्हीत कैद झालेल्या तीन महिलांना बायणा येथील वाईन शॉपमधून मुलाद्वारे पैसे चोरी प्रकरणी पकडण्यात यश मिळवले. या महिला चोरांना वास्को रेल्वे स्थानकांवरून पोलिसांनी काही तासांतच अटक केली. चोरीची घटना रविवारी सकाळी 11.30 वाजता घडली.

महिला चोरट्यांकडून चोरी केलेले पैसे पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच या चोरी प्रकरणात काही अल्पवयीन असल्याने त्यांना तिसवाडी येथील मेरशी अपना घरमध्ये पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आणखी महिला आणि दोन पुरुषांची टोळी असल्याचे समोर आले.

आणखी दोन महिलांना 41 सीआरपीसी अंतर्गत पकडून अटक करण्यात आली. तीन महिलांवर भा.दं.वि. 380, 34 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक मयुर सावंत यांनी दिली.

ग्राहक बनून लुटमारी

ग्राहक बनून आलेल्या महिलांनी वाईन दुकानात येऊन बियरची मागणी केली. महिलांना बियर पाहण्याच्या निमित्ताने दुकानदाराला फ्रिजकडे खिळवून ठेवले. यापैकी एकीने मुलाला ‘आत जाऊन पैसे काढून आण’ असे मराठीतून सांगितले. ते दुकानदाराने ऐकले. याचवेळी तो मुलगा काउंटरकडे आला आणि पैसे काढायला काउंटरमध्ये हात घातला असता दुकानदाराने त्याला पकडले. मात्र, महिलांनी त्या मुलाला दुकानदारांच्या हातातून हिसकावून घेऊन पळ काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Supreme Court: शिक्षा पूर्ण होऊनही 4.7 वर्षे अधिक तुरुंगात, सुप्रीम कोर्टाचा संताप; पीडिताला 25 लाखांची भरपाई देण्याचे सरकारला आदेश

Weekly Horoscope: नशिबाचा तारा उजळणार: 'या' 4 राशींना पैसा, यश आणि मान-सन्मान लाभणार

SUV खरेदीदारांसाठी खुशखबर! केंद्र सरकारच्या निर्णयानंतर महिंद्रा, टाटा आणि टोयोटाच्या गाड्या तब्बल 3.5 लाखांनी स्वस्त

Sanguem Lottery Winner: गणपती बाप्पा पावला...! सांगे गणेश मंडळाच्या लॉटरीत होमगार्ड महिलेला जॅकपॉट; 2 BHK फ्लॅटसह 35 लाखांची लागली लॉटरी

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

SCROLL FOR NEXT