काणकोण: काणकोणातील (Canacona) अंतर्गत भागातील रस्त्यांवर एकट्या-दुकट्या दुचाकी व पादचाऱ्यांना अडवून चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पाच जणांच्या या टोळी कडून गेल्या पंधरा दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. हत्तीपावल खोतीगावातील आड रस्त्यावर ही टोळी कार्यरत असून त्यामध्ये एका मोटारसायकल चालविण्याऱ्या युवतीचाही समावेश आहे.
कुंभेगाळ येथे आड रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी या टोळीने तेथून जाणाऱ्या एका इसमाला लुबाडण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी या टोळीतील काहींना पकडून जबर मार दिल्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. ही टोळी विशिष्ट समाजाची आहे. यासंदर्भात स्थानिकांनी तक्रार केल्यानंतर काहींना संशयावरून काणकोण पोलिसांनी ताब्यात घेतले.
मात्र चौकशीत काहीच संशयास्पद सापडले नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले, असे काणकोण पोलिसांनी सांगितले. मात्र, वन खात्याच्या हत्तीपावल येथून आमोणे, शिसेव्हाळ, खोतीगाव या भागांत रात्रीच्या वेळी जाणाऱ्या लोकांनी या घटनेचा बराच धसका घेतला आहे. अंधार पडण्यापूर्वी घर गाठण्यासाठी या भागातील रहिवासी प्रयत्न करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.