Mapusa Theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: म्हापसा दरोडाप्रकरणी 5 जण जेरबंद! मुख्य संशयित अजून मोकाट; पोलीस अधिकाऱ्यांचे मौन

Ganeshpuri Mapusa Theft: मंगळवारी (ता. ७) फिर्यादी डॉ. महेंद्र कामत घाणेकरांच्या बंगल्यावर सर्व कुटुंबीयांना बांधून घालून सहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील डॉ. घाणेकरांच्या बंगल्यावर दरोडा घातल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी पाचजणांना पकडल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण पश्चिम बंगालचे आहेत. परंतु, ताब्यात घेतलेले संशयित प्रमुख दरोडेखोर नसून ते या गुन्ह्यात दरोडेखोरांना साहाय्य करत होते, अशी माहिती समोर आली आहे.

मंगळवारी (ता. ७) फिर्यादी डॉ. महेंद्र कामत घाणेकरांच्या बंगल्यावर सर्व कुटुंबीयांना बांधून घालून सहाजणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. या बुरखाधारी दरोडेखोरांनी बंगल्यातून ३५ लाखांचा ऐवज पळविला होता. या घटनेला चार दिवस उलटले तरीही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही किंवा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करता आलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.

डॉ. घाणेकरांच्या बंगल्यावर दरोडा टाकून हे दरोडेखोर बाणस्तारी-साखळी-चोर्ला मार्गे बेळगावला गेले. तेथून पुढे ते हैदराबादच्या दिशेने गेले. त्यानुसार गोवा पोलिस पथकांचा मोर्चा हैदराबादकडे वळला. या दरोडेखोरांचे अंतिम लक्ष्य देशाची सीमा ओलांडून भूमिगत (अंडरग्राउंड) व्हायचे, हे आहे. त्यामुळे गोवा पोलिसांना संशयितांचा माग काढण्यासाठी बरीच खटपट करावी लागत आहे. परंतु, अद्याप पोलिसांच्या हाती काहीच ठोस लागलेले नाही.

काही पथके माघारी परतली

या प्रकरणाच्या तपासासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दिशेने गेलेली काही पथके गोव्यात माघारी परतली. तर उर्वरित पथके ही हैदराबादमध्ये संयुक्तरित्या दरोडेखोरांचा शोध घेताहेत. इतर पथके बंगळुरूमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

दोनापावल दरोड्याशी साम्य

गोवा पोलिसांनी बरेच परिश्रम घेत दरोडेखोरांना या गुन्ह्यात साहाय्य करणाऱ्या पाचजणांना (मदतनीस) पकडले. रेकी करून टाकलेल्या या दरोड्यात आठ ते दहाजण सहभागी आहेत. ज्या टोळीने डॉ. घाणेकरांच्या बंगल्यावर पद्धतशीरपणे दरोडा टाकला, त्यात आणि दोनापावल येथील बंगल्यावर टाकलेल्या दरोड्यातील बऱ्याच गोष्टींमध्ये साम्य आहे. याच टोळीतील काही सदस्य या दोन्ही दरोड्यांमध्ये सामील आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

पोलिस अधिकाऱ्यांचे मौन

गोवा पोलिसांनी ज्या पाचजणांना पकडल्याची माहिती समोर येत आहे, ते मुख्य दरोडेखोर नसून दरोड्यावेळी प्रमुख संशयितांना मदत करणारे मदतनीस आहेत. या संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेला चार दिवस उलटूनही गोवा पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागलेले नाहीत.

त्याचप्रमाणे पोलिस प्रशासन किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या दरोड्याप्रकरणी अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. पोलिस अधिकारीही काही बोलत नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT