Mapusa Theft Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: बंगल्यात घुसून सशस्त्र दरोडा, 35 लाख लुटले! गोवा पोलिसांची पथके बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मुंबईमध्ये दाखल

Ganeshpuri Mapusa Theft: दरोडेखोर टोळीशी संपर्कात असलेल्या इतर साथीदारांची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांची विविध पथके ही पश्चिम बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक व मुंबईमध्ये पाठवली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा : गणेशपुरी, म्हापसा येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील सशस्त्र दरोडाप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या दोघाही संशयितांची १४ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

दरम्यान, दरोडेखोर टोळीशी संपर्कात असलेल्या इतर साथीदारांची चौकशी करण्यासाठी गोवा पोलिसांची विविध पथके ही पश्चिम बंगाल, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक व मुंबईमध्ये पाठवली आहेत. संशयित संतोष बी. (२७, रा. बंगळूरू) व सफिकुल रोहूल अमीर (३७, रा. बंगळूरू) या दोघाही मूळ बांगलादेशी नागरिकांना म्हापसा पोलिसांनी अटक केली होती.

मंगळवार, २८ रोजी, संशयितांना पोलिसांनी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली. नंतर कोलवाळ कारागृहात संशयितांची रवानगीकरण्यात आली. दरम्यान, गेल्या ७ ऑक्टोबर रोजी डॉ. महेंद्र घाणेकर यांच्या बंगल्यावर हा सशस्त्र दरोडा पडला होता.

दरोडेखोरांनी पीडित घाणेकर कुटूंबियांना धमकावून व बंधक बनवून घरातील ३५ लाखांचा ऐवज लुटून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय.न्याय संहितेच्या ३३१(३), ११५ (२), ३५१ (३), १२६ (२), ३१० (२), ६१(२), १११ व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास म्हापसा पोलिस करत आहेत. दरोड्याच्या घटनेनंतर राज्यात गुन्हे वाढल्याची आणि सरकारचे गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Soha Ali Khan: 'गर्ल गँग'सोबत सोहाची पूलसाईड धमाल, गोवा ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर हिट!

India vs Australia T20I Series: सूर्या ब्रिगेडला मोठा झटका! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांतून स्टार अष्टपैलू बाहेर; बीसीसीआयने दिली महत्त्वाची अपडेट

साखळीनं बांधून मारहाण केली, 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आईने फोडला हंबरडा; मडगाव पोलिसांवर केले गंभीर आरोप

Goa Rain: कुठे बाजार बुडला, कुठे कोसळलं छत, हा पाऊस जाणार कधी? हवामान खात्याने दिली 'चांगली बातमी'

Dovorlim: दवर्लीत पुन्हा नाट्यमय घडामोड! सरपंचाविरोधातील अविश्‍वास ठराव बारगळला; भाजपला दणका

SCROLL FOR NEXT