Ganesh idol stolen in Mapusa Dainik Gomantak
गोवा

Ganesh Idol Theft: 'मी विसर्जनासाठी मदत करतो' म्हणत बाप्पा हातात घेतला अन् पोबारा; म्हापशात चांदीच्या दागिन्यांसह गणेशमूर्तीची चोरी

Ganesh idol with silver ornaments stolen: मदतीचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने चांदीच्या दागिन्यांनी सजलेली गणपतीची मूर्तीच पळवून नेल्याची घटना मंगळवारी रात्री म्हापसा येथील तारीकडे विसर्जनस्थळी घडली.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: मदतीचा बहाणा करून एका अज्ञात व्यक्तीने चांदीच्या दागिन्यांनी सजलेली गणपतीची मूर्तीच पळवून नेल्याची घटना मंगळवारी रात्री म्हापसा येथील तारीकडे विसर्जनस्थळी घडली. या प्रकारामुळे कुटुंबीयांना गणरायाची शेवटची आरतीही करता आली नाही. या घटनेने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

म्हापशातील पुजारी कुटुंबीय गेल्या १० ते १२ वर्षांपासून नियमितपणे तारीकडे विसर्जनस्थळी श्रींचे विसर्जन करतात. मंगळवारी रात्री ९ ते ९.३०च्या सुमारास दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी ते तेथे पोहोचले.

पती कार पार्क करण्यासाठी गेले, तर पत्नी गाडीतून पूजेचे व आरतीचे ताट काढत होत्या. लहान मुलेही गाडीजवळच थांबली होती. याच वेळी हा प्रकार घडला. दरम्यान,चोरीला गेलेल्या गणपतीच्या मूर्तीवर चांदीचा हार, मुकुट असे मौल्यवान दागिने होते. या दागिन्यांच्या लोभातूनच चोरट्याने हा डाव साधल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

‘शेवटची आरतीही करता आली नाही’

‘आम्ही गेली १०-१२ वर्षे येथे विसर्जनासाठी येतो. मुले विसर्जनासाठी मदत करतात, म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. पण आमच्यासोबत असा प्रकार घडेल, असे कधीच वाटले नव्हते. गणरायाची शेवटची आरतीसुद्धा करता आली नाही, याचे प्रचंड वाईट वाटत आहे,’ अशा भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.

म्हापशातील घटना

कुटुंबीय गाडीजवळ असताना एक अनोळखी युवक तेथे आला. ‘मी विसर्जनासाठी मदत करतो,’ असे सांगत त्याने गणपतीची मूर्ती नेण्यासाठी हात पुढे केला. विसर्जनस्थळी स्थानिक मुले किंवा स्वयंसेवक भाविकांना मदत करीत असल्याने कुटुंबीयांनी विश्वासाने बाप्पाची मूर्ती त्याच्या हाती सोपवली. मूर्ती हातात पडताच चोरट्याने गर्दीचा फायदा घेत तेथून पोबारा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

SIR Allegation: 'मतदारांची नावे रद्द करणे हे कटकारस्थान'; सरदेसाईंचा आरोप, दवंडेतील एकाच कुटुंबातील सहा नावे वगळल्याचे उघड

Abhinav Tejarana Captaincy: स्नेहलनंतर अभिनवकडे गोव्याच्या रणजी संघाची धुरा? 7 सामन्यांत 788 धावांचा पाऊस; कर्णधारपदासाठी तेजराणा आघाडीवर

America Visa: भारतीय आयटी प्रोफेशनल्ससाठी महत्त्वाची अपडेट! H-1B व्हिसा नियम मोडणाऱ्या कंपन्यांना 2.4 कोटींच्या दंडासह 10 वर्षांचा बॅन; नव्या विधेयकाने खळबळ

Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Electricity Tariff Hike: 1 नोव्हेंबरपासून उद्योगांची वीज महागणार! सौर-ऑफपीक वेळेत 80 पैसे, पीक अवरमध्ये 2 रुपये अतिरिक्त

SCROLL FOR NEXT