Ghumat in Goa Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi : आतुरता बाप्पाच्या आगमनाची; घुमट, समेळाचा घुमतोय नाद

घुमट, समेळ, कासाळ्याचे तालाने, आणि विविध देवतांच्या आरतीच्या सूरांमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi : बाप्पाच्या आगमनासाठी आता केवळ आठ-दहा दिवसांचा कालावधी उरला आहे. जस-जसे गणपती बाप्पाच्या आगमनाचे दिवस जवळ येऊ लागतात, तस-तशी आतुरता ही अधिक वाढू लागते. बाप्पा आपल्या घरी येणार यासाठी संपूर्ण घराची झाडलोट- रंगरंगोटी, काही जुन्या घरांमध्ये पताका लावणे आदी कामांना वेग येतो.

गोव्यात घरातील महिला चतुर्थीसाठी लागणारे गोडपदार्थ प्रामुख्याने नेवऱ्या, दोन प्रकारच्या बनविल्या जातात. एक पिठ्याच्या व दुसऱ्या रव्याच्या. पिठ्याच्या नेवऱ्यांमध्ये पिठीचे सारण भरले जाते. तर रव्याच्या नेवऱ्यांमध्ये रव्यापासून तयार केलेलं सारण. बाप्पाच्या पूजेत लागणारी देवभांडी, पंचपात्र, पडगा, कलश, ताम्हण, दिवे, समयी,पंचारती धुपारती आदी सर्व साहित्य स्वच्छ केले जाते. लहान-बालकांची, तसेच किशोरवयीन मुलांच्या आपण कोणते कपडे घेणार याबाबत गप्पा रंगतात. सकाळी उठून कामाला जाणे आणि रात्रभर तयारी करणे हा आता नित्यक्रमच झालेला आहे.

गणेशोत्सवात सर्वात अधिक महत्त्व आरतीला. गावा-गावात, वाड्या-वाड्यात सध्या घुमट वादनाच्या तयारीला जोर आला आहे. आरतीच्या रंगीत तालमी होऊ लागल्या आहे. घुमट, समेळ, कासाळ्याचे तालाने, आणि विविध देवतांच्या आरतीच्या सूरांमुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT