FDA Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: जागो ग्राहक जागो! चवथीला मिठाई खरेदी करताय? गोवा वजन व माप खात्याने केलंय महत्वाचे आवाहन

राज्यभरात धडक कारवाई सुरु राहणार

Pramod Yadav

सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाची मिठाई विक्री केली जाते तसेच, त्याच्या वजनात देखील घोळ केला जातो.

यापार्श्वभूमीवर राज्यातील अन्न आणि औषध प्रशासन तसेच वजन, माप खाते सतर्क झाले असून, ग्राहकांनी त्यांनी काही सुचना केल्या आहेत. याशिवाय मिठाई विक्रेत्यांना देखील सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

गोवा वजन व माप खात्याच्या वतीने संपूर्ण गोव्यात मोहिम राबवली जाणार आहे. याकाळात मिठाईचा दर्जा आणि वजन याबाबत फसवेगिरी केल्यास तात्काळ कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गोव्यातील मिठाई विक्रेत्यांनी याबाबत काळजी घेऊन सर्तक राहावे असे खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात बोर्डा, आर्लेम व घोगळ येथे मिठाईच्या दुकानावर छापा टाकण्यात आला. त्यापूर्वी काझीवाडा, पंडितवाडा व तिस्क येथील दुकानातही धडक कारवाई करण्यात आली. यापुढे देखील अशीच कारवाई सुरु राहणार असल्याची माहिती खात्याच्या वतीन कळविली आहे.

ग्राहकांनी घ्यावी काळजी

मिठाई खरेदी करण्यापूर्वी वजनकाटा शून्य आहे का याची खात्री करा.

रिकाम्या बॉक्सचे देखील वजन विचारात घ्या, मिठाई आणि बॉक्सचे वजन दुकानदाराकडून सुनिश्चित करा.

गणेशोत्सवाच्या काळात निकृष्ट दर्जाची मिठाईची विक्री होण्याची शक्यता असते. तसेच, मिठाई तयार करताना पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: प्रेम, व्यवसायात शुभ योग! कसा असेल पुढचा आठवडा? जाणून घ्या..

Kudnem: कौंडिण्य ऋषींच्या नावाचा अपभ्रंश होऊन झालेले 'कुडणे', लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून प्रकाशित होणारे मंदिर

Goa Cricket: ..आणखी एक 'क्रिकेटर' सोडणार होती गोवा! संघटनेची शिष्टाई सफल; सराव शिबिरास सुरवात

Goa Live News: नंबर प्लेट काढून धिंगाणा घालणाऱ्या दोन कार कार मालकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

Goa Crime: दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, राजस्थानच्या आरोपीने केले अज्ञातस्थळी बंदिस्त; वाचा एकूण प्रकार

SCROLL FOR NEXT