Ganesh Chaturthi 2021: plaster of Paris Ganpati Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi 2021: गोव्यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तींची तपासणीच नाही

मूर्तींविरोधात तक्रार करणाऱ्या पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांनीही कोणत्याही तक्रारी केलेल्या नाहीत.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्‍यात ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या (Plaster of Paris) मूर्तींवर बंदी असली तरी अशा मूर्ती राज्यात (Ganesh Chaturthi) आल्याच नाहीत, असे ठामपणे सांगणे अवघड बनले आहे. कारण गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण (Goa State Pollution Control) मंडळाने राज्यभरातून मूर्तींचे नमुनेच गोळा केले नाहीत. त्यांची तपासणीही केली नाही. उल्लेखनीय म्हणजे, मूर्तींविरोधात तक्रार करणाऱ्या पर्यावरणविषयक कार्यकर्त्यांनीही कोणत्याही तक्रारी केलेल्या नाहीत.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ चे पर्यावरणीय दुष्परिणाम ओळखून पर्यावरण संरक्षण कायदा 1986 अंतर्गत या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याला एक लाख रुपये दंड व पाच वर्षांची शिक्षा होऊ शकते. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनलेल्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होत असते. या प्रदूषणाचा परिणाम जलसंपदेवर होण्याबरोबरच माणसाचे आरोग्यही धोक्‍यात येऊ शकते, अशी जागृती मंडळ 2019 पर्यंत करत होते.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींवर बंदी लागू करण्याबरोबरच राज्यात गेल्या पाच सहा वर्षांपासून विज्ञान तंत्रज्ञान व पर्यावरण खाते तसेच हस्तकला महामंडळाने संयुक्तपणे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या दुष्परिणामांविषयी जागृती केली जात आहे. मूर्तिकार तसेच लोकांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत बरीच जागृती झालेली दिसत आहे. त्यामुळे यावर्षी राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कुठल्याही चित्रशाळेत दिसणार नाहीत किंवा त्या भाविकांद्वारे पूजल्या जाणार नाहीत, अशी अपेक्षा सरकारी पातळीवर असल्याचे दिसते.

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ बाबत

‘प्लास्टर ऑफ पॅरिस’चे रासायनिक नाव ‘कॅल्शिअम सल्फेट हेमिहायड्रेट’ असे आहे. याचे रासायनिक सूत्र आहे CaSO4.1/2H2O. जिप्सम हे एक स्फटिकासारखे खनिज असून त्याला गरम केल्यावर ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ बनते. मूलत: हे फ्रान्सची राजधानी पॅरिसच्याबाहेर मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे याचे नाव ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ असे पडले. ‘जिप्सम’ हे रंगविरहित पांढुरक्‍या रंगाचे असते. हे पाणी विद्रव्य (पाण्यात अत्यंत कमी विरघळणारे) व मऊ असते. जिप्सम(gypsum) चे रासायनिक नाव : कॅल्शिअम सल्फेट डायहायड्रेट. जिप्सम, सल्फर, मॅग्नेशियम आदी रासायनिक पदार्थांनी बनलेले असते.

सध्या महामंडळाकडून मूर्तींची पाहणी सुरू आहे. सध्या चिकण मातीच्याच मूर्ती आढळल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर मूर्तींसाठी केलेला आढळलेला नाही.

- डॉम्निक फर्नांडिस, सरव्यवस्थापक, हस्तकला महामंडळ.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींबाबत पोलिसांकडे तक्रार येते. ते मूर्ती जप्त करतात व मंडळाकडे पाठवतात. यंदा तशी तक्रार आली नसावी.

- गणेश शेटगावकर, अध्यक्ष, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

Goa Coconut Price: बाप्पांचे विसर्जन झाले, तरी नारळ अजून भडकलेलेच; चिबूड, तवशांचीही आवक वाढली

Rashi Bhavishya 07 September 2025: नोकरीत संयमाने काम केल्यास चांगले यश , आज मेहनतीपेक्षा हुशारी जास्त उपयोगी ठरेल

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

SCROLL FOR NEXT