CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

पीएफआयचं गोव्यातील संस्थेला फंडींग, CM प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली महत्त्वाची माहिती

'पीएफआय' संघटनेवर बंदी घातल्यानंतर गोव्यात या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

PFI- पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India) या देशव्यापी संघटनेवर बंदी घातल्यानंतर गोव्यात या संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कित्येकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा आरोप असलेल्या फातोर्डा येथील एका पीएफआय कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली होती. याच संबंधी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात माहिती दिलीय.

आरोपी अल्ताफ हुसेनसह पीएफआय आणि त्यांचे साथीदारआणि समर्थक यांच्या हालचालींवर कडक नजर ठेवली जात आहे. तसेच या प्रकरणी अल्ताफ सय्यद आणि त्याच्या जवळच्या 23 साथीदारांची कसून चौकशी करण्यात आली आहे.

तपासादरम्यान अल्ताफ सय्यद हा 'वुई फॉर फातोर्डा' या राजकीय गटालाही निधी देत ​​असल्याचे समोर आले असून यासंबंधीचा तपास अजूनही प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत सावंत यांनी आज विधानसभेत दिली.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि तिच्याशी संलग्न सर्व संघटना बेकायदेशीर असल्याचे काही दिवसांपूर्वी गृह मंत्रालयाने घोषित केल्यावर या संघटनेशी संबंधित असलेल्यांची देशभरात धरपकड सुरू केली असून सुमारे दीडशेहून अधिक नेते-कार्यकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Para Games 2026: सुवर्णा राजची 'गोल्ड' कामगिरी! डिस्कस थ्रोमध्ये पटकावलं सुवर्णपदक; आशियाई पॅरा गेम्समध्ये रचला इतिहास

Royal Enfield Upcoming Bikes: 'रॉयल एनफील्ड' आणणार 5 नव्या बाइक्स, 750cc सेगमेंटपासून इलेक्ट्रिक मॉडेलपर्यंत अनेक पर्याय मिळणार

October Heat: 'ऑक्टोबर हिट'मध्ये रुग्णवाहिका बंद पडली; मदतीला धावले अनोळखी हात, पण अधिकारी उभा राहिला बाजूला!

Waste Management: गोव्यात दररोज 3,824 किलो जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया; आकडेवारी आली समोर

Surya Gochar 2026: पैशांची चणचण संपणार, धनलाभाचा जबरदस्त योग! सूर्य गोचर ठरणार वरदान; 16 नोव्हेंबरपर्यंत 'या' 6 राशींची चांदी

SCROLL FOR NEXT