Beach |Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: किनारपट्टीवर इंधनविहिरी, सांडपाण्याच्या टाक्या; पर्यटन खात्याचे दुर्लक्ष

कळंगुट तसेच कांदोळी येथील किनारपट्टी भागात इंधनविहिरी वाळूच्या खाली खोदण्यात आल्या त्याकडे दुर्लक्ष केली जात असल्याने गोवा खंडपीठाने पर्यटन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दैनिक गोमन्तक

Goa Beach: कळंगुट तसेच कांदोळी येथील किनारपट्टी भागात इंधनविहिरी तसेच सांडपाण्याच्या टाक्या वाळूच्या खाली खोदण्यात आल्या आहेत तरी त्याकडे डोळेझाक केली जात असल्याच्या जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पर्यटन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पर्यटन खात्याने किनारपट्टी परिसरात केलेल्या तपासणीचा अहवाल सादर करण्याचे तोंडी निर्देश देत ही सुनावणी बुधवार, 8 रोजी ठेवली आहे. कांदोळी किनारपट्टी परिसरातील रेवबेन फ्रांको यांनी ही जनहित याचिका सादर केली आहे.

कळंगुट तसेच कांदोळी येथील किनारपट्टीवरील वाळूच्या खाली काही शॅकधारकांनी इंधनविहिरी खोदल्या असून त्याला प्लास्टिक पाईप जोडले आहेत. काहींनी खोदकाम करून या वाळूखाली सांडपाण्याच्या टाक्या बनविल्या आहेत. हे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन आहे.

कामचुकारपणाचे नोंदविले निरीक्षण

यावेळी उपस्थित असलेल्या पर्यटन खात्याच्या उपसंचालकांनी स्पष्टीकरण करण्याऐवजी याचिकेत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्यांची शहानिशा करण्यासाठी मुदत मागितली व संबंधित अधिकारी हे गोव्याबाहेर टूरवर जाणार असल्याचे कारण दिले.

भूजल नियमन कायद्याचे उल्लंघन होत असूनही पर्यटन खाते कोणतीच कारवाई करत नाही व याचिकेतील मुद्यांच्या शहानिशेसाठी मुदत देण्याची केलेली विनंती हा कामचुकारपणा होत असल्याचे तोंडी निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhandari Samaj: भंडारी समाजाच्या नेत्‍यांकडून मोर्चेबांधणी सुरू! एकसंघ करण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरू; लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

Morjim: ...तोपर्यंत ‘त्‍या’ स्मशानभूमीचा वापर नको! न्यायालयाचे निर्देश; मोरजी पंचायतीला धक्का

Drugs In Goa: कैद्यांना जर ड्रग्स मिळत असतील, तर बिट्स पिलानी ‘किस झाड की पत्ती’! गोव्याच्या मानगुटीवर बसलेले भूत

आत्महत्या की हत्या? 24 तास बेपत्ता, झुआरी पुलाजवळ आढळलेला मृतदेह, असोल्डातील व्यक्तीच्या मृत्यूने वाढले गूढ

Valpoi: वाळपईत 4 वर्षांत दगावली 154 गुरे! वाढती प्लास्टिक समस्या चिंताजनक; 12 महिन्यांची वासरेही बाधीत

SCROLL FOR NEXT