Traffic Rule Dainik gomantak
गोवा

वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडून, 'एवढा' दंड सरकारी तिजोरीत जमा

दैनिक गोमन्तक

मुरगाव तालुक्यात वाहतूक सुरळीत व्हावी, अपघातांवर नियंत्रण यावे आणि वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी वास्को वाहतूक खात्याचे पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर व त्यांच्या वाहतूक पोलीस सहकाऱ्यांनी आपल्या परीने उपाययोजना आखून वास्को वाहतूक पोलीस खात्याकडून मुरगाव तालुक्यात वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्यांकडून 1 जानेवारी ते 31 डीसेंबर 2021 पर्यंतच्या कालावधीत एकूण 43,001 गुन्ह्यांची नोंद करून एकूण 54,07,600 रुपये दंडापोटी सरकारी (Government) तिजोरीत जमा केले.

वास्को पोलीस खात्यात वाहूतक पोलिसांची कमतरता असतानाही नार्वेकर यांनी वाहतूक व्यवस्था योग्य तऱ्हेने हाताळण्याचे काम केल्याने मुरगाव (Mormugao) तालुक्यात सर्व थरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. वास्को वाहतूक पोलीस विभागाला लाभलेले मनमिळावू, शिस्तिला कठोर तसेच आपल्या पोलीस सहकाऱ्यांबरोबर मिळून मिसळून शांत चित्ताने काम करून घेणारे वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने मुरगाव तालुक्यात वाहतुकीचे (traffic) नियम धाब्यावर बसवून भरधाव वाहने हाकणे, एकेरी व बंद रस्ता, वाहन परवाना नाही,' आयुर्विमा नाही, गणवेश न घालणे, प्रदूषण दाखला नसणे आदी प्रकरणी वर्षभरात भरीव दंड ठोठावून वाहन चालकांना धारेवर धरले.

पोलीस (police) खात्याचे वाहतूक कक्ष वाहतूक नियमांबाबत लोकांमध्ये जागृती आणत असतात त्याचबरोबर वेळोवेळी नियम मोडणाऱ्यांना दंडही ठोठावतात, एवढे असून सुद्धा लोक नियमितपणे वाहतूक (Transportation) नियम मोडत आहेत व त्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वास्को पोलीस खात्याच्या वाहतूक विभागाचे निरीक्षक सुदेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी ते डिसेंबर 2021 या एका वर्षाच्या कालावधीत नियम मोडणाऱ्या 43,001 वाहन चालकांकडून 54 लाख 07 हजार 600 रु. दंड रुपाने वसूल करुन सरकारी तिजोरीत जमा केले.

यामध्ये जलदगतीने वाहन चालवणाऱ्या 452 चालकांकडून 1 लाख 52 हजार रु.,निष्काळजीपणाने वाहन चालवलेल्या 629 वाहन चालकांकडून 4 लाख 30 हजार 950 रु.दंडापोटी जमा केले. दारु पिऊन गाडी चालविणे 45 जणांवर कारवाई करण्यात आली, अशांना न्यायालय दंड ठोठावला असल्याचे सांगण्यात आले. धोकादायकपणे वाहन उभे केलेल्या 5053 जणांकडून 5 लाख 13 हजार 450 रु.वसूल केले, हेल्मेट न घालता वाहन चालविणे 16524 जणांकडून 16 लाख 60 हजार 100 रु.दंड जमा केला, वाहन चालवताना भ्रमणध्वनीवर बोलणाऱ्या 193 जणांकडून 1 लाख 22 हजार 350 रु. दंड जमा केला, दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या 36 जणांकडून 3600 रु.वसूल केले, बेकायदेशीरपणे रस्ता ओलांडणाऱ्या 30 जणांकडून 3000 रु., योग्यप्रकारे लाईट नसताना वाहन चालवणे 113 जणांकडून 11 हजार 300 रु. गोळा केले.

तसेच प्रखर झोतात वाहन चालविणाऱ्या 42 जणांकडून 4 हजार 250 रु. दंडापोटी जमा केले, विना परवाना 430 वाहन चालकांकडून 2 लाख 25 हजार रु.दंड वसूल केला, केबिनमध्ये प्रवाशांना बसविऱ्या 1219 वाहन चालकांकडूनकडून 1 लाख 35 हजार हजार 500 रु. दंड वसुल केला, वाहनांवर अधिक प्रवासी नेणाऱ्या 739 वाहनचालकांकडून 74 हजार 450 रु दंडापोटी जमा केले., माल वाहून नेणाऱ्या वाहनात प्रवाशी बसविणाऱ्या 33 जणांकडून 3300 रु. वसूल केले, चारचाकी वाहन चालवताना सिट बेल्ट न घालणाऱ्या 3853 वाहन चालकांकडून 3 लाख 86 हजार 50 रु. वसूल करण्यात आले, वाहनांच्या ग्लासला फिल्मिंग असलेल्या 1764 वाहन चालकांकडून 2 लाख 25 हजार 500 रु., नो पार्किंगच्या जागी वाहने उभी करून ठेवलेल्या 186 जणांकडून 26 हजार 100 रु. दंड रुपाने वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे प्रवेश निषेध (नो एंट्री) मधून प्रवेश करणाऱ्या 3537 वाहनचालकांकडून 3 लाख 59 हजार 50 रु.दंड भरपाई वसूल केली, साईड लाइट न लावता वाहन चालविणाऱ्या 100 वाहनचालकांकडून 10 हजार रु.वसूल करण्यात आले. 34 अल्पवयीन मुलांना वाहन चालवताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 19 हजार 650 रु. वसूल करण्यात आले, वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविणाऱ्या 376 वाहन चालकांकडून 1 लाख 88 हजार रु. दंड वसूल करण्यात आला, बसस्थानक नसताना बस थांबवून प्रवाशी घेणाऱ्या 2 बसचालकांवर कारवाई करून 400 रु.दंड वसूल केला. वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या 47 वाहन चालकांकडून 7 हजार 600 रु. दंडापोटी वसूल करण्यात आले.

वाहतूक परवाना सोबत न ठेवणे अशा 95 वाहन चालकांकडून 13 हजार 150 रु.दंडापोटी वसूल करण्यात आले, तसेच बसचा दरवाजा उघडा ठेवणे, अशा 28 वाहनांवर कारवाई करताना 3000 रु. गोळा करण्यात आले. इन्शुरन्स संपलेल्या 2 वाहन चालकांकडून 800 रु. दंड थोपटले, गणवेश न घालता वाहन चालविणे अशा 104 जणांकडून 10 हजार 400 रु., प्रदूषण परवाना नसताना वाहन चालवणाऱ्या 65 जणांकडून 34 हजार 400 रुपये दंड वसुल केला, चुकीच्या जागी पार्किंग करणाऱ्या 436 वाहन चालकांना 51 हजार 800 रु. दंड थोपटण्यात आला, एल् प्लेट लावलेली नसताना वाहन चालविणाऱ्या 6 जणांकडून 600 रु.दंड वसूल केला.

नं. प्लेट नसताना वाहन चालविणाऱ्या 653 जणांकडून 70 हजार 250 रु.दंडापोटी वसूल करण्यात आले, कायदेशीर नंबर प्लेट नसलेल्या 2069 वाहन चालकांकडून 2 लाख 18 हजार 200 रुपये दंड वसुल केला, जास्त प्रमाणात माल वाहतूक करणाऱ्या 37 वाहन चालकांकडून 3 हजार 700 रुपये वसूल करण्यात आले, साईड आरसा नसताना वाहन चालविणाऱ्या 1657 जणांकडून 1 लाख 93 हजार 250 रुपये दंड ठोठावण्यात आला, इतरांकडून इतर वाहतूक नियम धाब्यावर बसवलेल्या 1614 वाहन चालकांकडून 1 लाख 61 हजार 650 रुपये दंडापोटी जमा केले, झेब्रा क्राॅसिंगवर वाहन पार्किंग करणाऱ्या 30 वाहन चालकांकडून ३ हजार रुपये दंड वसुल केला.

लाल सिग्नल तोडून नियम मोडणाऱ्या 408 वाहन चालकांकडून 41 हजार 400 रुपये दंड वसुल करण्यात आला व टॅक्सी मिटर न बसवलेल्या 404 टॅक्सीचालकांवर कारवाई करुन 40 हजार 400 रुपये दंड वसुल करण्यात आला.अश्या प्रकारे एकूण 43001 वाहन चालकांकडून 54 लाख 7 हजार 600 रुपये दंडापोटी वसूल करुन सरकारी तिजोरीत जमा केले.

वाहतूक नियम पाळल्यास अपघातांची (accident) संख्या कमी होण्यास मदत होईल. तसेच पालकांनी पाल्यावर लक्ष केंद्रीत केल्यास त्यांच्याकडून वाहन चालवताना चूक होणार नाही. पालकांनी मुलांना रस्ता सुरक्षेविषयी माहिती द्यावी, तेव्हा वाहतूक नियंत्रणात येणार व अपघात टळणार, असा संदेश पोलीस निरीक्षक नार्वेकर यांनी दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT