Crime  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील वाढदिवसाच्या पार्टीत 'बर्थडे बॉय'चाच मित्रांनी घेतला बळी

ही घटना बेतीत घडली.

दैनिक गोमन्तक

पणजी: वाढदिवसाच्या पार्टीत मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मित्रांमध्ये भांडण झाले आणि त्यांनी 'बर्थडे बॉय'चाच खून केला. ही घटना बेतीत शुक्रवरी घडली. शिब्रण राम असे मृत युवकाचे नाव आहे. पर्वरी पोलिसांनी तपास सुरू केला असून सुमित विनोद कुजूर याला अटक केली आहे. उर्वरीत मुलांचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मालीम जेटीवरील ‘लकी स्टार फिशिंग ट्रॉलर’वर शिब्रण कामाला होता. वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने त्याने पार्टी आयोजित केली होती. त्याने सुमित, संतोष, प्रदीप आणि आणखी एका मित्राला आमंत्रण दिले होते. पार्टीमध्ये (Party) सर्वांनी दारू प्यायली. दारूच्या नेशत त्यांच्यात वाद झाला आणि त्यांनी शिब्रणला मारहाण केली. पुढे त्यांनी त्याला जखमी अवस्थेत मांडवी नदीत फेकून दिले आणि तिथून पळ काढला.

शनिवारी सकाळी पर्वरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाने नदीत शिब्रण याचा शोध सुरू केला. रविवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. मांडवीतील शोध सुरू असतानाच पोलिसांनी (Police) संशयितांपैकी सुमित कुजूर याला शनिवारी रात्री अटक केली. पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: केवळ फातोर्डासाठी काँग्रेसशी युती नको, गोव्यात सत्तेसाठी विरोधकांची एकजूट गरजेची; विजय सरदेसाईंनी स्पष्ट केलं युतीचं गणित

Saligao Waste Plant: पर्यटन पट्ट्यात दुर्गंधीचे साम्राज्य! साळगाव कचरा प्रकल्पाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव चव्हाट्यावर; मायकल लोबोंनी व्यक्त केली चिंता

Viral Video: 'रिक्षाच्या पुढून धावली अन् थेट...' चिमुरडीचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; तुम्ही पाहिला का?

Goa Cooperative Societies: सहकारी सोसायट्यांमधील ठेवींत 454 कोटींनी वाढ; थकीत कर्ज 258 कोटींनी वाढले, सरकारी अहवालातील निष्कर्ष

VIDEO: ट्रेकिंगचा आनंद अन् मृत्यूशी गाठ! ज्वालामुखीचा अचानक उद्रेक; पर्यटकांची पळापळ, थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT