We for Fatorda Dainik Gomantak
गोवा

We For Fatorda: मोफत भात कापणीचा फातोर्ड्यातील 250 शेतकऱ्यांनी घेतला लाभ

'वुई फॉर फातोर्डा' मार्फत भात कापणी यंत्राची सोय

दैनिक गोमन्तक

मडगाव: फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्थापन केलेल्या 'वुई फॉर फातोर्डा' या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या मोफत भात कापणी यंत्राची सोय करुन दिली आहे. या सेवेचा सुमारे 250 स्थानिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

(Free paddy harvesting facility for farmers of Fatorda through We for Fatorda)

आम्ही फातोर्डा परिसरातील शेतकर्‍यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून देत भात कापणीसाठी मदत करतो आहोत.ही आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणे हा आमचा उद्देश आहे. परिणामी, ते त्यांच्या उत्पन्नातून जास्त नफा मिळवू शकतात, असे आमदार विजय सरदेसाई म्हणाले.

सरदेसाई पुढे म्हणाले की, “आम्ही फातोर्डा परिसरातील शेतकऱ्यांसाठी ही कापणी सेवा मोफत पुरवतो आणि गेल्या 18 वर्षांची आमची परंपरा आहे, अलीकडच्या काळात काही उमेदवार निवडणुकीपूर्वी जागे होऊन शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामग्री पुरवण्यासाठी धावपळ करताना दिसत होते. पराभवाचा सामना केल्यानंतर ते 4 वर्षांच्या सुप्तावस्थेत जातात, असा टोल‍ा सरदेसाई यांनी विरोधकांचे नाव न घेता हाणला.

गोव्यात कृषी क्षेत्रात प्रचंड वाढ करण्याची क्षमता आहे. हे केवळ शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी विभागांच्या बांधिलकी आणि सहकार्यानेच साकार होऊ शकते. फातोर्ड्यामध्ये आम्ही आमच्या शेतकऱ्यांना कृषी उपकरणे तसेच अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देत राहू, असे आमदार सरदेसाई यांनी आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT