Leopard in Bicholim Dainik Gomantak
गोवा

Leopard In Bicholim : डिंगणे-सुर्ल भागात बिबट्याचे पुन्हा दर्शन; लोक भयभीत

कॅमेऱ्यात छबी कैद; पाळीव प्राण्यांवर संक्रांत

दैनिक गोमन्तक

Leopard In Goa: मुळगाव येथे दहशत माजवलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले असले, तरी डिचोलीतील काही ग्रामीण भागांत बिबट्याचा मुक्त संचार असल्याची माहिती मिळाली आहे.

मुळगाव येथे लोकवस्तीत संचार करणारा बिबट्या 14 ऑगस्ट रोजी मध्यरात्री वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला. त्यामुळे मुळगावमधील जनता भयमुक्त झाली आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने तालुक्यातील शिरगावसह डिंगणे-सुर्ल येथे बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले.

तीन महिन्यांपूर्वी डिंगणे-सुर्ल भागात लोकवस्तीत दहशत निर्माण केल्यानंतर गायब झालेल्या बिबट्याचे पुन्हा गावात वावर वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी रात्री एका घरापर्यंत संचार करताना बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

तीन महिन्यांपूर्वी हा बिबट्या त्याच घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने प्रयत्नही केले होते. या बिबट्याचे पुन्हा दर्शन झाल्याने लोकांमध्ये घबराट पसरली आहे.

शिरगावातही पुन्हा संचार

शिरगावातही एका बिबट्याने गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवली आहे. शिरगाव पंचायत कार्यालयाच्या जुन्या इमारत परिसरात या बिबट्याचा संचार असल्याची माहिती मिळाली. बिबट्याच्या संचारामुळे स्थानिक जनतेमध्ये भीती पसरली आहे.

आतापर्यंत या बिबट्याने सहाहून अधिक पाळीव कुत्र्यांना फस्त केले आहे. रात्री सोडाच, दिवसाही हा बिबटा लोकवस्तीजवळ संचार करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT