Casino in Madovi Dainik Gomantak
गोवा

ED Raids Goa Casinos: कर चुकवेगिरी, फ्रॉड व्यवहारांची चौकशी; ईडीची उशीरा रात्री कॅसिनोत झाडाझडती

Panaji Casino ED Raid: यापूर्वी काळ्या पैशांच्या आरोपातून ही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने कॅसिनोची चौकशी केलीय.

Pramod Yadav

पणजी: कर चुकवेगिरी, फ्रॉड व्यव्हारांची चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने रात्री उशीरा गोव्यात झडाझडती घेतली. मांडवी नदीत असलेल्या तरंगत्या कॅसिनोत ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास केल्याची माहिती मिळाली. बुधवारी (११ डिसेंबर) सायंकाळी सुरु झालेला तपास रात्री उशीरापर्यंत सुरु होता अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सक्तवसुली संचालनालयाने बुधवारी रात्री मांडवीतील कॅसिनोत झाडाझडती घेतली. कर चुकवेगिरी, फ्रॉड व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीने हा तपास केल्याची माहिती आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील ईडीने अशाप्रकारे कॅसिनोत तपास केला होता. काळ्या पैशांच्या आरोपातून ही चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीने कॅसिनोची चौकशी केलीय.

मांडवीती अनेक तरंगेत कॅसिनो आहेत. सरकारला महसूल मिळवून देण्यात कॅसिनोंचा मोठा वाटा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या कॅसिनोत काळ्या पैशांचा बाजार, कर चुकवेगिरी आणि फ्रॉड बँक व्यव्हारांचे आरोप होत आहेत. ईडीने या आरोपातून पुन्हा कॅसिनोत चौकशी केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय.

कॅश फॉर जॉब स्कॅममध्ये ईडीची एन्ट्री

राज्यात गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणाची चौकशी आता ईडी करत आहे. ईडीने दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात तपास सुरु केला. पोलिसांकडून केसची माहिती घेतली असून, कोट्यवधी रुपये अफरातफरीच्या मुळाशी जाण्याची ईडी प्रयत्न करेल, अशी आशा आहे. विरोधकांनी देखील याप्रकरणी अधिक सविस्तर चौकशीची मागणी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपला तिसऱ्या आघाडीची भीती नाही! दामू नाईकांचा विरोधकांना टोला; '2027 मध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार'

Goa Congress: काँग्रेसची 'गोवा राखण यात्रा' 22 सप्टेंबरपासून! 27 दिवसांत सर्व 40 मतदारसंघांचा दौरा; जमीन, पर्यावरण आणि अस्मितेसाठी लढ्याची घोषणा

Guru Mangal Yuti 2026: 18 सप्टेंबरला महाचमत्कार! गुरु-सेनापती युतीनं चमकणार 4 राशींचं नशीब; हाती लागणार कुबेराचा खजिना

खरी कुजबुज: युरीवर भरोसा नाही काय?

Goa Politics:गोवा फॉरवर्डला 'आप'चा हात? केजरीवालांच्या 'मोठ्या घोषणे’कडे लक्ष; 2027 साठी नव्या राजकीय समीकरणाची नांदी

SCROLL FOR NEXT