Fraud case Dainik Gomantak
गोवा

Goa Housing Board Scam: गोवा गृहनिर्माण मंडळाचा अधिकारी असल्याचं भासवून भामट्याने घातला लाखोंचा गंडा; महिलेला नोकरी आणि भूखंडाचे आमिष

Fake Housing Official Scam In Goa: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राळ उडाली असतानाच गोवा गृहनिर्माण मंडळाचा अधिकारी असल्याचं भासवून लाखोंचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

Manish Jadhav

पणजी: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राळ उडाली असतानाच गोवा गृहनिर्माण मंडळाचा अधिकारी असल्याचं भासवून लाखोंचा गंडा घातल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

गोवा गृहनिर्माण मंडळाचा अधिकारी असल्याचं भासवून मंडळाकडून भूखंड घेऊन देण्याचे तसेच लेखा संचालनालयामध्ये कारकुनाची नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी भाटले-पणजी येथील मोहम्मद सादिक शेख याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी नेवरा-पिलार येथील नसरीन बानू मझहरली हिने तक्रार दिली असल्याची माहिती पणजी पोलिस निरीक्षक विजय चोडणकर यांनी दिली.

भूखंड मिळवून देण्याचे आमिष

दरम्यान, संशयित मोहम्मद सादिक शेख याने तक्रारदार नसरिन बानू हिला पर्वरी येथील गोवा गृहनिर्माण मंडळाचा भूखंड मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मंडळामध्ये तो कामाला असल्याचेही तिला सांगितले. त्यानुसार जुलै 2021 मध्ये त्याने मंडळाचे भूखंड विक्री होणार असल्याचे सांगितले. त्या भूखंडाचा बोगस आराखडा तसेच खोटी कागदपत्रेही दाखवली.

भूखंड खरेदीसाठी तिने संशयिताला 3 लाख 30 हजार रुपये दिले. त्याने पैशांची पोचपावती म्हणून मंडळाची बनावट पावती दिली. भूखंड विक्री केलेले कादगपत्रे तसेच आराखडाही तिला दिला. त्यानंतर संशयिताने तिला लेखा संचालनालयामध्ये कारकुनाची नोकरी उपलब्ध करुन देण्यासाठी 2 लाख 20 हजार रुपये तिच्याकडून घेतले. त्याने उद्योग खात्याच्या नावाचे नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र तिला दिले.

बरेच दिवस झाले तरी मंडळाचा भूखंड तसेच नोकरी संशयिताने न दिल्याने तिने त्याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. त्याच्यावरील संशय बळावल्याने तिने त्याला पैसे परत करण्यास सांगितले. मात्र, पैसे देण्याचे आश्‍वासन देऊन त्याने टोलवाटोलवी सुरु केली. भूखंड खरेदी करण्याचा तसेच नोकरीसाठी पैसे देण्याचा व्यवहार संशयिताच्या घरी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT