Francisco Sardinha Dainik Gomantak
गोवा

Francisco Sardinha: चर्चिल आता निवडून येणे शक्य नाही; कुडतरी किंवा बाणावलीतुनही नाही!

दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांची टीका

गोमंतक ऑनलाईन टीम

Francisco Sardinha: गोव्यात गेल्या काही दिवसांत दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन आणि माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. त्यात आता खासदार सार्दिन यांनी आलेमाव यांच्यावर निशाणा साधला आहे. चर्चिल हे कुडतरीच काय बाणावलीतुनही निवडून येऊ शकणार नाहीत, असे वक्तव्य सार्दिन यांनी केले आहे.

सार्दिन म्हणाले की, कुडतरी किंवा बाणावलीतूनही चर्चिल आलेमाव आता निवडून येऊ शकत नाहीत. ते आता केवळ केंद्र, राज्य सरकारला पाठिंबा दर्शवून पैशासाठी इतरांपुढे हात पसरू शकतात.

यापुर्वी चर्चिल आलेमाव म्हणाले होते की, कुडतरी हा माझा मतदारसंघ असून येथून मी कधीही निवडून येऊ शकतो. कारण, कुडतरीचे लोक माझ्यावर प्रेम करतात. त्यापुर्वीही चर्चिल यांनी केंद्रासह राज्यातील भाजप सरकारचे गोडवे गाताना आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप जिंकून येईल, असे भाकीत केले होते.

त्यावर फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह विजय सरदेसाई आणि आलेक्स रेजिनाल्ड यांनीही आलेमाव यांच्यावर टीका केली होती.

तेव्हापासून चर्चिल आलेमाव हे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. ते सातत्याने भाजपची बाजू लावून धरताहेत, त्यांनी त्यांचा मुलगा आणि मुलगीदेखील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT