Bori Panchkroshi hill flowers Dainik Gomantak
गोवा

Hill flowers: डोंगरमाथ्यावर फुलले सुगंधी पांढरे सोने! बोरी पंचक्रोशीतील टेकड्यावर मोगरा, जाई, केवडा, चाफा, बकुळीचा सुगंध

Mogra Jasmine Kevda flowers Bori: फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या बोरी गावात सध्या जाईच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

बोरी: फुलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या बोरी गावात सध्या जाईच्या फुलांचा सुगंध दरवळत आहे. मोगरा, जाई, केवडा, चाफा, बकुळ आदी सुगंधी फुलांच्या उत्पादनातून येथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर जाईच्या फुलांना मोठी मागणी असल्याने बोरी परिसरातील टेकड्या आणि डोंगरमाथे सध्या अक्षरशः सुगंधी पांढऱ्या सोन्याने बहरले आहेत.

तिशे-बोरी, सुकन्ने, खाजोर्डा, आवेडे, तामशिरे, पाणीवाडा, देऊळवाडा, शिरशिरे आदी भागांतील टेकड्या आणि डोंगरमाथ्यांवर जाईची झुडपे मोठ्या प्रमाणावर आहेत. जून महिन्यात जाई उत्पादक या झुडपांभोवतीचा परिसर स्वच्छ करून उत्पादनाची तयारी करतात. जाईचे पीक फार कष्टाचे नसले, तरी फुले काढणे आणि त्यांची गुंफण करणे हे अत्यंत कौशल्याचे व श्रमाचे काम असते.

जाई गुंफण्यासाठी केळीच्या गाभ्यापासून तयार करण्यात येणारा ‘व्हावळी’ हा नैसर्गिक दोर वापरला जातो. मे महिन्यात तो तयार करून वाळवून ठेवला जातो. वापरापूर्वी तो पाण्यात भिजवून मऊ केला जातो. त्यानंतर त्यात जाईच्या कळ्या गुंफून पट, गजरे, वेण्या, फात्या आणि आट्या तयार केल्या जातात.

पहाटे पाच वाजल्यापासून डोक्यावर विजेरी आणि कमरेला ‘कुरकुट’ (खळी) बांधून महिला व पुरुष जाईच्या कळ्या तोडण्यासाठी मळ्यांत जातात. मोठ्या मळ्यांमध्ये एकाच वेळी पाच-सहा किंवा त्याहून अधिक जण कळ्या काढण्याचे काम करतात. सकाळी आठ-नऊपर्यंत कळ्या तोडण्याचे काम पूर्ण होते. त्यानंतर अनेकजण मिळून त्या कळ्या फुलण्यापूर्वीच त्यांचे पट, गजरे व वेण्या तयार करतात.

या कामासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक मळेमालक हंगामात कामगारांची मदत घेतात. तयार झालेले जाईचे पट बोरी गावातील मुख्य हमरस्ता, बोरी पुलाचा जोडरस्ता तसेच कुठ्ठाळी पुलाच्या परिसरात विक्रीसाठी ठेवले जातात. याशिवाय मडगाव, वास्को, फोंडा, पणजी, कुडचडे आदी शहरांमध्येही त्यांची विक्री केली जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT