Arrested Betting in Goa Dainik gomantak
गोवा

Betting in Goa: पाकमधील सामन्‍यांवर हणजूणमध्‍ये सट्टेबाजी

दैनिक गोमन्तक डिजिटल

Betting in Goa: पाकिस्तानात सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट सामान्यांवर सट्टा लावताना हणजूण येथील एका बंगल्यातून दिल्लीतील चौघांना काल रात्री अटक केली.

सट्टेबाजीचा पर्दाफाश करत गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँच पथकाने 2 लाखांचे 5 मोबाईल्स जप्त केले. याच मोबाईलवरून ग्राहकांकडून सुमारे 3 लाखांची सट्टेबाजी स्वीकारली होती अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे सुरिंदर कार्ला, रजत कार्ला, कशिश कार्ला व हितेश कार्ला अशी आहेत. ते मूळचे दिल्लीतील असून सट्टेबाजीसाठी गोव्यात आले होते.

त्यासाठी त्यांनी बादे-हणजूण येथे ‘ला पासादो व्हिला’ भाडेपट्टीवर घेतला होता. पोलिसांना या सट्टेबाजीबाबत खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती.

गेल्या 26 फेब्रुवारीला पाकिस्तान सुपर लीग क्रिकेटचा सामना लाहोर क्यूलँडर्स विरुद्ध पेशावर झल्मी यांच्यात सुरू होता. त्यावेळी संशयित मोबाईलवरून ऑनलाईन सट्टेबाजी स्वीकारत होते.

गोवा जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३ व ४ तसेच भादंसंच्या कलम १२० (ब) खाली त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

आगामी ‘आयपीएल’ही रडारवर; गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित

मार्च महिन्‍याच्‍या अखेरीपासून बहुचर्चित आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेतील सामन्‍यांवरही मोठ्या प्रमाणावर सट्टेबाज होऊ शकते.

यापूर्वी गोव्यात भाडेपट्टीवर बंगले किंवा फ्लॅट घेऊन बेटिंग करत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. पोलिसांनी छापे टाकून कारवाईही केलेली आहे.

या स्पर्धेवेळी गोव्यात वास्तव्य करणाऱ्या सट्टेबाजांची माहिती मिळविण्यासाठी पोलिस गुप्तचर यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे व त्यासाठी पोलिस पथकेही नेमण्यात आलेली आहेत.

घरमालकांना पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आले असल्‍याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT