Four passengers were injured when a passenger bus hit the electricity pole at Shiroda on Tuesday Dainik Gomantak
गोवा

शिरोड्यात भीषण अपघात, प्रवासी बसची पाच दुचाकींना धडक

बसची पाच दुचाकींना व वीजखांबाला धडक

दैनिक गोमन्तक

शिरोडा : फोंड्याहून सावर्डेच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी बसने शिरोडा बाजारातील रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला जोरदार धडक दिल्याने हा वीज खांब वीजवाहिन्यांसह रस्त्यावर कोसळला. या अपघातात बसने पाच दुचाकींना जोरदार धडक दिल्यामुळे मोठा बाका प्रसंग उद्भवला हा अपघात आज मंगळवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडला. (Four passengers were injured when a passenger bus hit the electricity pole at Shiroda on Tuesday)

अपघातावेळी स्कुटरचालकाने उडी घेतल्याने तो बचावला. फोंड्याहून सावर्डेला जाणाऱ्या जीए 04 टी 4289 या बसगाडीच्या चालकाला चक्कर आल्याने हा अपघात घडला असल्याचे समजते. या अपघातात बसमध्ये बसलेल्या पाच महिला किरकोळ जखमी झाल्या.

रस्त्यावरअसलेल्या अन्य 4 जणांना किरकोळ दुखापती झाल्या. सुदैवाने मासेमारी महिला अपघात होत असलेला पाहून महिलांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. अपघातावेळी रस्त्यावर अन्य कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघाता वेळी मोठा आवाज झाल्याने लगत असलेल्या लोकांत मोठी घबराट उडाली. त्यानंतर लगेच स्थानिकांनी बचाव कार्य हाती घेतले. अपघातानंतर फोंडा पोलिस तसेच अग्निशामक दलाला कळविण्यात आले फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

juva: सफर गोव्याची! चारही बाजूने नदी आणि मध्ये वसलेले 'जुवे'

Thailand School Shooting: चिमुकल्यांच्या किंकाळ्यांनी हादरलं थायलंड! 18 वर्षांच्या माथेफिरुची अंधाधुंध फायरिंग; 22 मुलांसह 36 जणांचा मूत्यू VIDEO

IND vs PAK: भारतीय खेळाडू पाकिस्तानी खेळाडूंशी करणार हँडशेक? पाकड्यांच्या 'या' अटीवर काय म्हणालं आयसीसी?

Rajpal Yadav: राजपाल यादवच्या मदतीला धावला 'भाईजान'! अजय देवगण, वरुण धवनसह मदतीसाठी सरसावले बॉलिवूड

VIDEO: शाळेच्या मैदानात किंकाळ्या अन् रक्ताचा सडा! माथेफिरुच्या गोळीबारात 10 ठार, 24 जखमी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

SCROLL FOR NEXT