Parra Rioting Case Dainik Gomantak
गोवा

Parra Rioting Case: पर्रा दंगलप्रकरण; पोलिसांनी तपासकामात अनेक त्रुटी ठेवल्या - न्यायालय

चार नायजेरियन न्यायालयाकडून निर्दोष, पर्रा येथील दंगल, पर्वरीत राष्‍ट्रीय महामार्ग रोखल्याचे प्रकरण

दैनिक गोमन्तक डिजिटल

Parra Rioting Case: दशकापूर्वी लोबोवाडा - पर्रा येथील दंगलप्रकरण व पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्ग अडविल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा पुराव्याअभावी सिद्ध होत नसल्याने चार नायजेरियन संंशयितांना म्हापसा दिवाणी न्यायालयाने निर्दोषमुक्त केले.

या नायजेरियनच्या गटाने दंगल तसेच महामार्ग अडविताना पोलिसांविरुद्ध बळाचा वापर केल्याचा कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे पुराव्याअभावी त्यांना निर्दोष ठरवण्यात येत असल्याचे दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

नायजेरियनच्या गटाने त्यांच्या एका साथीदाराचा मृत्यू झाल्याने पर्रा येथे दंगल घडवून आणली होती तसेच पर्वरी येथील राष्ट्रीय महामार्ग अडवून त्याचा मृतदेह शववाहिकेतून बाहेर काढून रस्त्यावर ठेवला होता.

हा गट हैदोस घालत होता तसेच पोलिसांना ड्युटी करण्यापासून अडथळे आणत होता. त्यांना अटक करण्यापासून पोलिसांना कोणी रोखले होते, असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यामुळे नायजेरियन नागरिकांचा गट त्यांच्या ओबोदो उझोना सिमेओन याचा मृतदेह पाहण्यासाठी जमले होते. त्यामुळे त्यांचा जमाव बेकायदा होता, असा निष्कर्ष काढता येत नाही. या घटनेतील सर्व संशयित एकसारखे दिसत असल्याने साक्षीदार वा तक्रारदार त्यांची ओळख पटवू शकलेले नाहीत.

तपासकामात अनेक त्रुटी

पर्वरी येथे नायजेरियनना अटक केल्याची नोंद पर्वरी पोलिस स्थानकात नाही. शववाहिकेच्या चालकाची न्यायालयात जबानी नोंदवलेली नाही. ही घटना 13 ऑक्टोबर 2013 रोजी झाली.

मात्र, पंचनामा त्याच दिवशी न करता दुसऱ्या दिवशी केला होता. त्याच दिवशी पंचनामा तपास अधिकाऱ्यांनी का केला नाही, याचे उत्तर पोलिसांकडे नाही. पर्रा व पर्वरी येथील गुन्ह्यात साम्य असून पोलिसांनी तपासकामात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chandra Grahan: 2025 मधलं भारतातलं पहिलं आणि अंतिम चंद्रग्रहण; कधी आणि कुठे दिसेल जाणून घ्या..

Green Cess Goa: धक्कादायक! 178 कोटींचा हरित कर थकीत; जिंदाल, झुआरी, अदानी, वेदान्‍तासह 26 कंपन्‍या थकबाकीदार

Rashi Bhavishya 28 July 2025: खर्च नियंत्रीत ठेवा, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी ठेवा; कुटुंबात आनंदाचे क्षण येतील

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

SCROLL FOR NEXT