Ferry Service in Goa
Ferry Service in Goa Dainik Gomantak
गोवा

राज्यात चार नवीन फेरीबोटी

दैनिक गोमन्तक

पणजी: नदी परिवाहन खात्याच्‍या ताफ्यात आणखी चार नवीन फेरी बोट्स जोडल्या जाणार आहेत. यातील दोन फेरी बोटींसाठी यावर्षी 7 जानेवारी रोजी कामाचा आदेश देण्यात आला होता. प्रत्येकी 94.50 लाख रुपये मूल्य यांचे असणार आहे. तर, इतर दोनसाठी येत्या 1 ऑगस्टला ई - निविदा खुली केली जाणार असल्याची माहिती नदी परिवहन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिली आहे.

(Four new ferries in goa state)

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी यासंदर्भात अतारांकित प्रश्‍न विचारला होता. खात्याच्या ताफ्यात सध्या 30 फेरी बोट्स कार्यरत आहेत. यातील बहुतांश फेरी बोट्सचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यांना वाहतूक करण्यायोग्य प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तर, दिवाढी येथील फेरी मार्गावर स्थानिकांनी अतिरिक्त फेरी बोटची मागणी केली होती. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ती पूर्ण केली जाणार असल्याचे, फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. सरदेसाई यांनी राज्यातील फेरी बोट्स, त्यांची देखरेख, जेटी यासंदर्भात अतारांकित प्रश्‍न विचारला होता.

धक्क्यांची डागडुजी

राज्यात 17 ठिकाणी फेरी बोट जलमार्गांवर धक्के (जेटी) आहेत. परंतु, यातील दोन वगळ्यास इतर धक्क्यांना डागडुजीच्या कामाची गरज असल्याचे उत्तर नदी परिवाहन खात्याने दिले आहे. पणजी येथील धक्का हा उत्तम स्थितीत आहे. तर, हळदोणे येथील धक्क्याचे नुकतेच काम पूर्ण झाले आहे. इतर 15 ठिकाणी धक्क्यांना दुरुस्त करण्याची आवश्‍यकता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Modi Goa Meeting : लुटारू काँग्रेसचे स्वप्न अपूर्ण ठेवा! पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी 7 वर्षांची मुलगी ठरली 'देवदूत'; सतर्कता दाखवत वाचवला जीव

PM Modi Goa Rally: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोमंतकीयासाठी कोणत्या सहा गॅरंटी दिल्या? वाचा

PM Modi Goa Rally: गोव्यातून PM मोदींनी डागली तोफ; ''काँग्रेसनं देशात तुष्टीकरणांचं राजकारणं केलं...''

Goa Today's News Update: मोदींची सभा, काँग्रेसचे प्रश्न; गोव्यात राजकीय धुळवड, दिवभरातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT