fire in Mapusa on Monday midnight Dainik Gomantak
गोवा

म्हापशात सोमवारी मध्यरात्री चार घरांना 'आग'

सुमारे 6 लाख रुपयांची मालमत्ता भस्मसात

दैनिक गोमन्तक

म्हापसा: दत्तवाडी-म्हापसा येथील श्रीदत्त मंदिराजवळील चार घरांना सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागून सुमारे सहा लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने झुंज देत सुमारे तीन तासांच्‍या अथक प्रयत्‍नांनंतर आग आटोक्यात आणली.

म्हापसा अग्निशामक दलाला रात्री 12.40 च्या सुमारास आगीची माहिती मिळाल्यानंतर आग विझवण्‍यास सुरूवात झाली. म्हापसा येथाल दोन तसेच पर्वरी व पणजी येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी आला व रात्री साडेतीनच्या सुमारास आग विझवण्यात

आली. या आगीत घरातील किंमती ध्वनियंत्रणा, दागिने, रोकड, लॅपटॉप, फर्निचर, महत्त्वपूर्ण कागदपत्रे आदी जळून खाक झाले. लक्ष्मी मारुती यल्लाविनी, चय्या आयवक, रामदास चव्हाण व अशोक तलवार यांची ही घरे आहेत. सर्वाधिक नुकसान लक्ष्मी यल्लाविनी यांना ३ लाखांची तर, चय्या यांची दीड लाखांची हानी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cruise Tourism: क्रूझवरुन गोव्यात 67,594 प्रवासी, 9 महिन्यांत कमावलं 4.82 कोटींचं उत्पन्न; मुरगाव बंदर बनलं क्रूझ पर्यटनाचं केंद्र

Lok Sabha in Konkani: वाल्लोर! लोकसभेचं कामकाज कोकणीत होणार; इतिहासात पहिल्यांदाच संसदेत 'गोव्याचा' आवाज दुमदुमणार

Ganesh Chaturthi: 'दीपवती' नावाने ओळखले जाणारे, गोव्यातील सर्वांत मोठे गणेश मंदिर; 16 व्या शतकाच्या पूर्वार्धात स्थलांतरीत झाले..

The Hundred League: 13 चेंडूत 50 धावा...! ‘द हंड्रेड’मध्ये आरसीबीच्या खेळाडूंचा धमाका; जेकब बेथेलने मोडला 136 वर्ष जुना रेकॉर्ड

Goa Crime: 'इन्स्टा'वरून युवतींची फसवणूक, 5 अजामीन वॉरंट, लैंगिक अत्याचाराचा गुन्हा; अट्टल गुन्हेगाराची कोठडीत रवानगी

SCROLL FOR NEXT