South Goa Dainik Gomantak
गोवा

South Goa: 21.42 लाखांची इलेक्ट्रिक केबल, 1.30 लाखांची दारू चोरी; चौघांना अटक

दक्षिण गोवा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

Pramod Yadav

South Goa: गोव्यात चोरीच्या दोन घटना समोर आल्या आहेत. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी 21.42 लाखांची इलेक्ट्रिक केबल चोरी केली आहे तर, दुसऱ्या घटनेत चोरट्याने चक्क 1.30 लाखांची दारू चोरी केली आहे. दक्षिण गोवा पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे.

(Four Held for stealing Electric cables and cash & liquor bottles at Quepem And Cuncolim)

Quepem Police

इलेक्ट्रिक केबल चोरीची घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी केपे (Quepem) परिसरातून 21 लाख 41 हजार 990 रूपयांची इलेक्ट्रिक केबल चोरी केली होती. केपे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मेहताब अली (रा. ओल्ड गोवा) याच्यासह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी वीज साहित्यही जप्त केले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

(Electric cables stolen from Quepem)

Cuncolim Police

दारू चोरी

कुंकळ्ळी येथील एक बार व रेस्टॉरंटमधून 1 लाख 30 हजार रूपायांची दारू चोरीला गेल्याची घटना समोर आली. कुंकळ्ळी (Cuncolim) पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपी नासिर इरफान मदनोळी (रा, कारवार) याला अटक केली आहे. आरोपीने बार व रेस्टॉरंटमधून काही कॅश देखील चोरी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे.

(Stealing cash & liquor bottles from a Bar & Restaurant in Cuncolim)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Atishi In Goa: भ्रष्टाचारावर बोलणाऱ्यांची पदावरुन हकालपट्टी केली जाते, गोव्यात 'आप'च एकमेव पर्याय; आतिषी भाजपवर कडाडल्या

India vs Pakistan: "कुठल्या तोंडानं पाकिस्तानसोबत सामना खेळणार? भारत-पाक क्रिकेट सामन्यावरून ओवैसी आक्रमक, PM मोदींना केला सवाल

Goa Assembly: गोव्यातून दारु तस्करी रोखण्यासाठी सरकार घेणार होलोग्राम स्टिकर्सची मदत; महाराष्ट्राच्या सीमेवर उभारणार चेकपोस्ट

Goa Assembly Session: "गोवा विद्यापीठाच्या प्रकरणावर सभागृह समिती स्थापन करा" युरी आलेमाव

Viral News: तुम्ही म्हणाल 'शी.. घाण' पण, स्वीडिश प्रौढ मनोरंजन कंपनी कर्मचाऱ्यांना देतंय 30 मिनिटांचा खास ब्रेक, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT