Mumbai Goa Highway Accident Akashwani Mumbai
गोवा

Mumbai Goa Highway Accident: 4 ठार, 3 जखमी; मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Mumbai Goa Highway Accident: स्कॉर्पिओ वीर रेल्वे स्थानकाजवळ डिझेल संपल्यामुळे थांबली होती. गाडीतील प्रवासी बाहेर उभे होते.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident

अलिबाग: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. टोइंग व्हॅनने स्कॉर्पिओला दिलेल्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, तीनजण जखमी झाले आहेत. वीर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे आज (०३ डिसेंबर) पहाटे हा अपघात झाला. जखमींवर उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आकाशवाणी मुंबईने दिलेल्या वृत्तानुसार, स्कॉर्पिओ वीर रेल्वे स्थानकाजवळ डिझेल संपल्यामुळे थांबली होती. गाडीतील प्रवासी बाहेर उभे होते. दरम्यान, याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या टोइंग व्हॅनने स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली यात चार जणाचा मृत्यू झाला असून, तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मृत आणि जखमी प्रवासी महाड येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमीवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. बचाव पथकाने जखमी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, यात चारजणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमींवर उपचार सुरु आहेत. टोइंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT