Benaulim ZP Election Dainik Gomantak
गोवा

Benaulim ZP Election 2024: बाणावलीमध्ये होणार अटीतटीची लढत! ‘इंडिया’विरोधात तिघा बंडखोरांनी थोपटले दंड

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim ZP Election 2024: बाणावली जिल्‍हा पंचायत निवडणुकीसाठीचे मतदान अवघ्‍या एका आठवड्यावर येऊन ठेपले आहे. एकूण चार उमेदवार रिंगणात उभे आहेत. या चारही उमेदवारांमध्‍ये मते विभागली जाण्‍याची शक्‍यता असल्‍याने ही लढत अटीतटीची होण्‍याची शक्‍यता आहे.

‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार म्‍हणून ‘आप’चे जोसेफ पिमेंता हे रिंगणात असून त्‍यांच्‍याविरोधात काँग्रेसच्‍या बंडखोर अपक्ष उमेदवार रॉयला फर्नांडिस यांनी दंड थोपटले आहेत. ग्रेफन्‍स फर्नांडिस आणि फ्रँक फर्नांडिस हे अन्‍य दोन अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत.

बाणावली जिल्‍हा पंचायत मतदारसंघात बाणावली, वार्का, ओडली, करमणे आणि केळशी या पाच पंचायतींचा समावेश असून एकूण २०,१५५ मतदार आहेत. यातील सर्वांत जास्‍त मतदार बाणावली पंचायत क्षेत्रात असून ती संख्‍या ९७९३ एवढी आहे.

वार्का पंचायत क्षेत्रात ४१४१, करमणेत २९९६, केळशीत १६५२ तर ओडली पंचायत क्षेत्रात १५७३ मतदार आहेत. बाणावली पंचायत ज्‍याच्‍या बाजूने राहील त्‍याचा विजय नक्‍की, असे या मतदारसंघाचे गणित आहे.

मागच्‍या जिल्‍हा पंचायत निवडणुकीत या मतदारसंघातून ‘आप’चे उमेदवार हें‍जल फर्नांडिस हे विजयी झाले होते. हा मतदारसंघ इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होता. फर्नांडिस यांनी जातीचा अवैध दाखला सादर करून ही निवडणूक लढविल्‍याचा आरोप सिद्ध झाल्‍यानंतर निवडणूक आयोगाने त्‍यांना अपात्र ठरविले होते. त्‍यामुळे आता ही पोटनिवडणूक घेतली जात आहे.

चौघांमध्‍ये मते विभागली जाण्‍याची शक्‍यता

या निवडणुकीत सर्वपक्षीय उमेदवार म्‍हणून ‘आप’ने जोसेफ पिमेंता यांना निवडणूक रिंगणात उतरविले असले तरी हा बाणावलीच्‍या काँग्रेस कार्यकर्त्यांवर केलेला अन्‍याय आहे, असा दावा करून रॉयला फर्नांडिस व ग्रेफन्‍स फर्नांडिस हे अन्‍य दोन उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. फ्रँक फर्नांडिस हेसुद्धा निवडणूक लढवत आहेत. त्‍यामुळे या उमेदवारांमध्‍ये मते विभागली जाण्‍याची शक्‍यता असल्‍याने कुणाची सरशी होईल हे सांगणे कठीण बनले आहे.

आलेमाव कुटुंबात फूट; तिघांची तोंडे तीन दिशांना

बाणावली मतदारसंघात अजूनही आलेमाव कुटुंबाचा शब्‍द चालतो. मात्र यावेळी या कुटुंबातीलच तीन चुलत बंधू तीन वेगवेगळ्‍या उमेदवाराला आपला पाठिंबा देत असल्‍याचे चित्र आहे. यामुळे आलेमाव कुटुंबातच फूट पडल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. चर्चिल आलेमाव यांचे पुत्र सावियो यांनी आपली सगळी शक्‍ती ग्रेफन्‍स फर्नांडिस यांच्‍या मागे लावली आहे तर ज्‍योकिम आलेमाव यांचे पुत्र युरी यांनी आपला पाठिंबा जोसेफ पिमेंता यांना जाहीर केला आहे. दुसरीकडे आल्‍वेर्नाझ आलेमाव यांचे पुत्र वॉरन आलेमाव यांनी रॉयला फर्नांडिस यांना पाठिंबा दिला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT