Colva Crime News:  Dainik Gomantak
गोवा

Colva Crime News: कुकने केला घात, गोव्यात काम करणाऱ्या बिहारच्या डॉक्टरचा खून, राजस्थान येथून चौघांना अटक

रोख रक्कम, मोबाईल आणि गाडीच्या चोरीसाठी हा खनून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Pramod Yadav

Colva Crime News: बेतालभाटी येथे राहणाऱ्या डॉ. निर्वाण भारत या 27 वर्षीय आय स्पेशालिस्टचा खून त्यांच्याचकडे स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या सिमांचल परिदा (31) याने आपल्या अन्य तीन साथीदारांच्या मदतीने केल्याचे उघड झाले असून हा खून केल्यावर डॉक्टरांचीच गाडी घेऊन पळून जाताना त्यांना भिलवाडा राजस्थान येथे अटक केली आहे.

सीमांचल परिदा (वय 31, रा ओडिसा), अलोक सिंग (वय 19), नागेंद्र कुमार (वय 25) (दोघेही रा. अलवार राजस्थान) आणि शाहिद खान (वय 23, रा. दादर, मुंबई) असे अटक संशयित आरोपींची नावे आहेत. आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. असे दक्षिण गोवा पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

रोख रक्कम, मोबाईल आणि गाडीच्या चोरीसाठी हा खनू करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

खून 07 रोजी संध्याकाळी होण्याची शक्यता आहे. मूळ बिहार येथील पण गोव्यात काम करणारे डॉ. भारत काल आपल्या क्लिनिकमध्ये न आल्याने आणि फोनही घेत नसल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या काही सहकाऱ्यांना त्यांच्या फ्लॅटवर पाठविले असता त्यांच्या बेडरूममध्ये असेलेल्या खाटीच्या बॉक्स मध्ये हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांच्या हाती जे सिसीटीव्ही फुटेज लागले आणि संशयितांच्या मोबाईल लोकेशन वरून पोलिस ह्या खुन्या पर्यंत पोहोचले अशी माहिती धानिया यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

संपादकीय: अहवालप्रवण प्रशासन

Indian Cricket Team: टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? खेळाडूंच्या वारंवार दुखापती अन् आता थेट राजीनामा, BCCIकडून निर्णय बाकी

GCA: 'जीसीए'च्या तुळशीदास शेट्ये, हरीश शिंदेंना अटकपूर्व जामीन! सरकारी ऑडिटरला डांबून ठेवल्याचा, दबाव आणल्याचा आरोप

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

SCROLL FOR NEXT