Sarbananda Sonowal Dainik Gomantak
गोवा

Mormugao Port project: आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमुळे गोव्याचा कायापालट होईल

मुरगाव बंदर प्रकल्पाची मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते पायाभरणी

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमुळे गोव्याचा कायापालट होईल असे मत केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी व्यक्त केले. मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची सोनावाल यांच्या हस्ते आज पायाभरणी झाली. यावेळी ते बोलत होते.

(Foundation stone laid for Mormugao Port project by minstar Sarbananda Sonowal)

यावेळी बोलताना ते म्हणाले की, पर्यटन पायाभूत सुविधा विकास’या योजनेअंतर्गत हा प्रकल्प गोव्याचे प्रवेशद्वार ठरेल, तसेच सार्वजनिक खाजगी भागीदारी ( PPP ) पद्धतीने टर्मिनलच्या देखभालीसाठी आणखी 21 कोटींची गुंतवणूक केली जाईल. अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.

देशांतर्गत क्रूझसाठी अतिरिक्त 13.4 एकर जमिनीवर हा प्रकल्प विकसित केला जाईल. या प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ प्रवाशांच्या फायद्यासाठी रो-रो, रो-पॅक्स आणि फेरी सेवेची सुविधा देखील समाविष्ट आहे. या जलमार्गाद्वारे वाहतुकीचा वापर उत्तर गोवा आणि इतर पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी केला जाईल असे ते म्हणाले. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 101.72 कोटी इतकी असल्याचं ही ते म्हणाले. यावेळी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आणि अन्य नेते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT