M. Venkaiah Naidu Dainik Gomantak
गोवा

M. Venkaiah Naidu: कर्मभूमी गोवा असणाऱ्या बिगरगोमंतकीयांनी कोंकणी भाषा शिकावी...

माजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांचे आवाहन

Akshay Nirmale

M. Venkaiah Naidu Goa Visit: गोव्यात वास्तव्यास असलेल्या इतर राज्यातील नागरिकांनी कोंकणी शिकली, कोंकणीतून बोलले पाहिजे, असे आवाहन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.

8 राज्ये आणि 5 केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापना दिनानिमित्त आज, बुधवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

नायडू म्हणाले की, कोणत्याही राज्यातील माणसाला आपल्या मायबोली, संस्कृती व मायभूमीबद्दल अभिमान असणे गरजेचे आहे. गोवेकरांनी कोकणी भाषेचा प्रचार, प्रसार तसेच दैनंदिन जीवनात वापर करायला हवा.

याबरोबरच गोव्यात राहणाऱ्या बिगर गोमंतकीय नागरिकांनी कोकणी शिकली पाहिजे. गोव्यातील बिगरगोमंतकीयांची जन्मभूमी वेगळी असली तरीही कर्मभूमी गोवा आहे. त्यामुळे त्यांनी कोंकणी भाषा शिकावी. कोंकणीतून बोलावे.

ते म्हणाले, एक भारत श्रेष्ठ भारत रचण्यासाठी देशाचे माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अनेक राज्यांना एकत्रित आणले आणि विविधतेत एकता कशी टिकवायची हे दाखवून दिले. आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि नंतर बाकीची ओळख असेल. हे आम्ही विसरता काम नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

महाराष्ट्र, कर्नाटकात दारु तस्करी रोखण्यासाठी गोवा सरकारचा मोठा निर्णय, सीमेवर उभारणार तपासणी नाका Video

Goa Made Liquor Seized: गोवा बनावटीच्या दारूची तस्करी; सिंधुदुर्गातील इन्सुली चेकपोस्टवर 6.80 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात

Goa Spa Scam: गोव्यात 'स्पा'च्या नावाखाली फसवणूक? पर्यटकाने सांगितला धक्कादायक अनुभव; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल!

Gautam Gambhir Fight: तू येथून निघ... पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचं इंग्लंडमध्ये झालं भांडण! पाहा VIDEO

रेस्टॉरंटमध्ये अचानक घुसला 'छोटा' पाहुणा, कर्मचाऱ्याने प्रेमाने दिला नाश्ता; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT