Police Station Dainik Gomantak
गोवा

ओशेल येथे माजी सरपंचांना बाऊन्सरकडून मारहाण

कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आल्याची तक्रार हणजूण पोलिस ठाण्यात नोंद झाली

दैनिक गोमन्तक

शिवोली: घुबलावाडा-ओशेल येथे अनेक वर्षे वास्तव्य करून राहणाऱ्या आरती जाधव आणि कुटुंबीय (मूळ. मिरज) तसेच स्थानिक सांगेलकर कुटुंबियांमध्ये घराच्या मालकी हक्कावरुन रविवारी सकाळी जोरदार भांडण झाले. यावेळी प्रकरणाची माहिती करून घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेल्या माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य ॲड. रेषल हरमलकर व त्यांचे पती संतोष हरमलकर यांना सांगेलकर कुटुंबियांकडून जबर मारहाण करण्यात आल्याची तक्रार हणजूण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे

हणजूण पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्वेता सावळ यांनी बुधा सांगेलकर, जयेश सांगेलकर, विशाल सांगेलकर, स्वेता मांद्रेकर (घुबलावाडा-ओशेल), मानिकचंद (झारखंड) आणि रेशमा खान (आसगाव) यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. जाधव कुटुंबियांकडून मदतीची हाक मारली गेल्याने आपण पंचायत सदस्य या नात्याने घटनास्थळी गेली होते.

जाधव यांच्या घराची मोडतोड करणारे जेसीबी मशीन तसेच एका ट्रकचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे उपस्थित असलेल्या अज्ञात महिला बाऊन्सरकडून आपल्याला आडवे पाडून मारहाण करण्यात आली तसेच आपले पती संतोष हरमलकर यांनाही त्या महिलांनी नखांनी ओरबडल्याचे ॲड. हरमलकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

जाधव कुटुंबीय मुळचे परप्रांतीय असून, आपल्या वडिलांनी त्यांच्याशी लेखी करार करून मर्यादित काळासाठी त्यांना आपल्या मालमत्तेत राहाण्याची मुभा दिली होती. परंतु कराराची कालमर्यादा ओलांडलेली असल्याने आपल्या वडिलांनी त्यांना घर सोडण्याची सूचना केली होती. त्यानंतर जाधव कुटुंबियांकडून अरेरावीची भाषा करण्यात येत असल्याचे जयेश सांगेलकर यांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास हणजूण पोलिस करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT