Former President of All India Konkani Parishad Basti Vaman Shenoy passed away

 

Dainik Gomantak 

गोवा

विश्व कोकणी केंद्राचे प्रवर्तक 'बस्ती वामन शणय' यांचे निधन

अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मंगळुरू येथील विश्व कोंकणी केंद्राचे प्रवर्तक बस्ती वामन शणय (88) यांचे आज सकाळी मंगळुरू येथे दुःखद निधन झाले.

दैनिक गोमन्तक

मडगाव: अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मंगळुरू येथील विश्व कोंकणी केंद्राचे प्रवर्तक बस्ती वामन शणय(Basti Vaman Shenoy) (88) यांचे आज सकाळी मंगळुरू येथे दुःखद निधन झाले. उद्या सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. शणय हे मंगळुरू येथील कोंकणी भाषा व संस्कृती केंद्राचे संस्थापक असून उद्या त्यांचे पार्थिव सकाळी 9 ते 10 पर्यंत शक्तीनगर मंगळुरू येथील विश्व कोंकणी केंद्राच्या सभागृहात लोकांसाठी अंत्यदर्शन घेण्यासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर बंटवळ येथील स्मशानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बस्ती माम या नावाने संपूर्ण कोंकणी वर्तुळात प्रसिद्ध असलेले शणय हे कुशल संयोजक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने उभारलेल्या कोंकणी भास व संस्कृती केंद्रातर्फे कोंकणी भाषा (Kokani Language), साहित्य व संस्कृती यांच्या संवर्धनाचे मोठे कार्य चालविले होते. जगातील सर्व कोंकणी लोकांना एकत्र आणणारे केंद्र म्हणून त्यांनी या संस्थेचा वापर केला होता. शणय हे 2004 साली कोरिकोडाय येथे भरलेल्या अखिल भारतीय कोकणी परिषदेचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या निधनावर गोव्याच्या कोकणी भाषा मंडळाने दुःख प्रगट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT