Savitri Kavalekar Dainik Gomantak 
गोवा

माजी आमदारांनी सांगेसाठी काहीही केले नाही; सावित्री कवळेकर

गेल्या 5 वर्षात माझ्या कामावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे

दैनिक गोमन्तक

सांगे : सावित्री कवळेकर यांनी सांगेतून विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवणारच, असा दृढनिश्चय जाहीर सभेत उपस्‍थित जनसमुदायासमोर अनेकदा केला आहे. तसेच मला कोणीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी असंख्य कार्यकर्त्यांच्या बळावर माझा विजय निश्‍चित आहे. तमाम महिला आपला प्रतिनिधी म्हणून मला एक संधी देतील, असा विश्‍वास देखील त्‍यांनी याआधी व्‍यक्त केला आहे. (Goa Politics Update: Savitri Kavlekar Against BJP in Goa)

दरम्यान, माजी आमदारांनी सांगेसाठी काहीही केले नाही, आणि गेल्या 5 वर्षात माझ्या कामावर जनतेचा पूर्ण विश्वास आहे. ते मला मतदान करतील त्यामुळे सांगे मतदार मतदारसंघातून माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास सावित्री कवळेकर यांनी व्यक्त केला. सावित्री कवळेकर यांनी भाजपला तिकीटाची मागणी केली होती, मात्र त्यांना भाजपने (BJP) डावलले आहे. त्या अपक्ष लढत आहेत. त्यामुळे सांगे मतदारसंघातून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, भाजपाच्या सांगेतील उमेदवारीच्या यादीतून सावित्री कवळेकर यांचे नाव काढण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यामध्ये सुरू असलेली संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे. सावित्री कवळेकर (Savitri Kavalekar) आणि सुभाष फळदेसाई या दोन्ही नेत्यांनी भाजपाच्या उमेदवारिवर दावा केला होता. त्यामुळे नेमके कोणत्या बाजूने जावे अशी स्थिती भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांची झाली होती. पक्षाने फळदेसाई यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांमधील गोंधळ संपुष्टात आला असून सर्व जण फळदेसाईं यांच्यासाठी प्रचार करतांना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT