P. S. Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

P S Sreedharan Pillai: राजभवनाचे लोकभवनात रूपांतर करणारे 'पी. एस. श्रीधरन पिल्लई'

Former Goa Governor Sreedharan Pillai: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राज्यातील प्रत्येक गावाला भेट दिली. सर्वसामान्यांत मिसळणारे राज्यपाल अशी ओळख त्यांनी निर्माण केली.

Sameer Panditrao

पणजी: राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राज्यातील प्रत्येक गावाला भेट दिली. सर्वसामान्यांत मिसळणारे राज्यपाल अशी ओळख त्यांनी निर्माण केली. राजभवनाचे दरवाजे सर्वांना उघडून ते लोकभवन बनवले होते.

लोकांच्या जवळ जाणारा राज्यपाल म्हणून ओळख: गावांमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधणे, जिल्ह्यांतील दौरे करून समस्या समजून घेणे.

राज्यपाल राहत असलेल्या राजभवनचे ‘लोकभवन’ रूपांतर: सामान्य नागरिकांसाठी राजभवनाचे दरवाजे खुले ठेवणे.

कतिशील राज्यपाल: अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी: गरजू व सामाजिक संस्थांना निधी आणि मदत देणे. कोविड काळात वैद्यकीय मदतीचे वाटप.

‘साहित्य व संस्कृती संवर्धन’ उपक्रम : गोमंतकीय लेखक, कवी, कलाकार यांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम. राजभवनात साहित्य संमेलने, कविसंमेलने, वाचन प्रेरणादिन इत्यादी उत्सव साजरे.

‘ज्ञान प्रोत्साहन’ कार्यक्रम : गोव्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये नियमित भेटी. विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी व्याख्याने व संवाद.

धार्मिक आणि सांस्कृतिक समभाव जपणारे नेतृत्व : विविध धर्मीय उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थिती. चर्च, मंदिर, मशीद यांच्या व्यवस्‍थापन समित्यांशी सौहार्दपूर्ण संबंध.

‘राज्यपाल लेखन’ उपक्रम : कार्यकाळात अनेक पुस्तके, कवितासंग्रह आणि विचारप्रवृत्त लेख प्रकाशित. राजभवनातून प्रकाशित साहित्याला साहित्यिक वर्तुळात मान्यता.

घटनेच्या चौकटीत राहून सक्रिय सहभाग : सरकारच्या योजनेवर लक्ष ठेवत सकारात्मक सल्लागार भूमिका निभावली. आपत्ती व्यवस्थापन व नैसर्गिक संकटाच्या वेळी तातडीने मदत.

‘वामनवृक्ष कला उद्यान’ स्थापनेत पुढाकार : गोव्यात बोन्साय (वामनवृक्ष) कलेला प्रोत्साहन देणारे विशेष उद्यान विकसित करण्याची कल्पना साकार केली. पर्यावरण जागृती, सौंदर्यदृष्टी आणि भारतातील पारंपरिक वनस्पती संवर्धन यांचा संगम साधणारी ही संकल्पना गोव्यात प्रत्यक्ष आकाराला आली.

गोवा विद्यापीठावरून वादग्रस्त ः गोवा विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठीशी घालण्याचा आरोप वारंवार झाला. राज्यपालांनी थेटपणे तसे वक्तव्य केले नसले तरी कुलगुरूंकडून राज्यपाल आपल्या पाठिशी आहेत असे भासवले जायचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT