Former Director General Of Police Jaspal singh  Dainik Gomantak
गोवा

Jaspal Singh: जसपाल यांचा जाता जाता राजकारण्यांना इशारा, माजी DGP नी पत्रात काय लिहलंय?

Goa Police: पोलिस मुख्यालयात नवे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे पदभार सोपवला

गोमन्तक डिजिटल टीम

अलीकडच्या घडामोडींचा माझ्यावर परिणाम झालाय यात शंकाच नाही. पण आम्ही सैनिक आहोत आणि टीका सहन करण्याची माझी क्षमता आहे. मी कोणावरही रागावलेलो नाही किंवा माझ्‍या मनात कोणाबद्दलही वितुष्‍ट नाही.

पण आपण परस्परविरोधी उद्दिष्टे असलेल्या लोकांसमवेत राहत असल्याने घर्षण होणे निश्चित आहे. गोव्याच्या गोड आठवणी सोबत घेऊन जात आहे, ही वाक्ये आहेत माजी पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी पदभार सोडताना दिलेल्या लेखी पत्रातील.

सदर पत्र सिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून लिहिले आहे. पोलिस मुख्यालयात आज सकाळी त्यांनी नवे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे पदभार सोपवला. जसपाल सिंग यांची बदली आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याच्या आरोपातील कथित सहभागानंतर झाली आहे. त्यामुळे जाताना ते काय भावना व्यक्त करतात, याकडे सर्वांचे विशेषत: समस्‍त गोमंतकीयांचे लक्ष लागून राहिले होते.

शक्‍य तेवढ्या चुकीच्‍या गोष्‍टी टाळल्‍या

जसपाल सिंग यांनी पत्रात म्हटले आहे, आम्‍ही जेव्‍हा सेवा बजावतो, तेव्‍हा लोकांशी संवाद, संबंध येतो. संवादाच्‍या अभावामुळे काही गोष्टी चुकीच्या होऊ शकतात. म्हणून, मी शक्य तेवढा संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला व चुकीच्‍या गोष्‍टी टाळण्‍याचा प्रयत्न केला. माझे कार्य, दृष्टिकोन आणि शून्य त्रुटी धोरणामुळे काहींनी मला तुच्छ लेखले असेल. पण मला त्‍याची पर्वा नाही.

माझ्याकडे नेतृत्वाची एक अतिशय परोपकारी शैली आहे. सहकाऱ्यांकडून मी कधी कसलीच अपेक्षा केली नाही. पोलिस कर्मचारी हा फुटबॉलसारखा असतो. प्रत्येकजण गोल झाल्याचा रेकॉर्ड पाहतो आणि ठेवतो. परंतु कोण गोल वाचवतो, हे कोणीही लक्षात ठेवत नाही.
जसपाल सिंग, माजी पोलिस महासंचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

Noise Pollution: 'आवाज नको, डीजे तुझ्या...!' गणेशोत्सवात कर्णकर्कश संगीताला विरोध; भक्ती, परंपरा आणि संस्कृती जपण्याचे आवाहन

Goa Cultural: गोव्यातील गणपतीची अनोखी काष्ठशिल्प परंपरा! च्यारी-चितारी समाजाच्या हातातून साकारलेले लाकडी गणेशरूप, शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा

SCROLL FOR NEXT