Siolim Bridge Dainik Gomantak
गोवा

Siolim Bridge Stunt: देशी ते देशी आता विदेशी पण, शिवोली पुलावर परदेशी पर्यटकाचा धोकादायक स्टंट

विदेशी पर्यटक देखील धोकादायक स्टंट करतानाची एक घटना समोर आली आहे.

Pramod Yadav

Siolim Bridge Stunt: गोव्यात येऊन प्रत्येक पर्यटक धमाल, मौजमस्ती करत असतो. पण, काही पर्यटक जीवावर बेतणारे आणि धोकादायक स्टंट तसेच, अवैध पद्धतीने काही कृत्य करण्याचा प्रयत्न करत असतात. वारंवार अशा घटना समोर आल्या आहेत.

यात प्रामुख्याने देशी पर्यटक अशा घटना करत असल्याचे दिसून आले आहे. पण, आता विदेशी पर्यटक देखील धोकादायक स्टंट करतानाची एक घटना समोर आली आहे.

समोर आलेल्या व्हिडिओनुसार, एक विदेशी पर्यटक शिवोली येथील पुलावर धोकादायक पद्धतीने स्टंट करताना दिसत आहे. पर्यटक पुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढून त्यावर चालताना दिसत आहे. कोणताही आधार न घेता हा पर्यटक भिंतीवर चालत आहे.

दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहन धारकाने या पर्यटकाचा व्हिडिओ शूट केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, लोकं या स्टंटवर चिंता व्यक्त करत आहेत.

शापोरा नदीवर असणारा शिवोली येथील पूल लांबी आणि उंचीने खूप मोठा असून, धोकादायक मानला जातो. नदीपात्र देखील मोठे आहे. दरम्यान, हा विदेशी पर्यटक कोणत्या देशातील आहे किंवा त्याचे नाव काय आहे? याबाबत माहिती मिळू शकली नाही.

अशा पद्धतीने स्टंट करून धोक्यात घालू नये असे आवाहन वारंवार सरकार व पर्यटन खात्याच्या वतीने केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT