Maha Shivratri At Vagator Beach Dainik Gomantak
गोवा

Maha Shivaratri In Goa: गोव्याच्या बीचवर महादेवाला दुग्धाभिषेक; 25 वर्षापासून परदेशी पर्यटक महाशिवरात्रीला लावतायेत हजेरी

Maha Shivaratri Celebration 2025: गेल्या २५ वर्षापासून परदेशी पर्यटक खास महाशिवरात्रीसाठी याठिकाणी हजेरी लावत आहेत.

Pramod Yadav

वागातोर: पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असलेला गोवा येथील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि मान्यतांसाठी देखील तितकाच ओळखला जातो. गोव्यात विविध सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. महाशिवरात्री देखील गोव्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी खास परदेशी पर्यटकांनी देखील हजेरी लावली.

वागातोर समुद्रकिनाऱ्यावर खडकावर महादेवाचे शिल्प साकारण्यात आले आहे. प्रेमानंद आगरवाडेकर दरवर्षी याठिकाणी महादेवाला दुग्धाभिषेक घालून महापूजा केली जाते. स्थानिक आणि परदेशी पर्यटक देखील या महापूजेत सहभाग घेतात.

Maha Shivratri At Vagator Beach
Maha Shivratri At Vagator Beach

यावर्षी देखील मोठ्या संख्येने विदेशी पर्यटक हेजरी लावली आहे. गेल्या २५ वर्षापासून परदेशी पर्यटक खास महाशिवरात्रीसाठी याठिकाणी हजेरी लावत आहेत.

Jungle Man

जंगल मॅनने साकारले महादेवाचे शिल्प

वागातोर येथे एका खडकावर जंगल मॅन या इटालियन नागरिकाने महादेवाचे शिल्प साकारले आहे. देश -विदेशातील पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे पूजा केली जाते. यावर्षी देखील येथे महादेवाची पूजा करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT