South Goa Trending Video Dainik Gomantak
गोवा

"ही भारतातील सगळ्यात स्वच्छ जागा...",विदेशी पर्यटक दक्षिण गोव्याच्या किनाऱ्यांवर फिदा; Video Viral

South Goa Beaches Viral Video: जगभरातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात सध्या पर्यटकांची संख्या वाढत असतानाच, येथील स्वच्छतेबाबत एक अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे.

Akshata Chhatre

जगभरातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात सध्या पर्यटकांची संख्या वाढत असतानाच, येथील स्वच्छतेबाबत एक अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया समोर आली आहे. एका विदेशी पर्यटकाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत दक्षिण गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

स्वच्छतेमुळे पर्यटक अचंबित

व्हिडिओमध्ये या पर्यटकाने सांगितले की, गोवा म्हटले की डोळ्यासमोर मोठ्या संख्येने पर्यटक आणि त्यामुळे होणारा घाणेरडा परिसर असे चित्र होते. मात्र, दक्षिण गोव्यातील समुद्रकिनारे पाहून त्याला सुखद धक्का बसला. तो म्हणाला, "संपूर्ण भारतात मी यापेक्षा स्वच्छ किनारे पाहिले नाहीत." किनाऱ्यांवर जागोजागी ठेवलेल्या कचराकुंड्या पाहून त्याला येथील स्वच्छता व्यवस्थापनाची योजना खूप आवडली. लोक मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहून तो खूप आनंदी झाला.

अविस्मरणीय सूर्यास्त

या पर्यटकाने दक्षिण गोव्यातील किनाऱ्यांवर एक सुंदर सूर्यास्त पाहिल्याचेही नमूद केले, ज्यामुळे त्याचा अनुभव अविस्मरणीय झाला. गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच, येथील स्वच्छतेची काळजी घेतली जात असल्यामुळे पर्यटकांना किती आनंद मिळतो, हे या व्हिडिओतून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT