Goa Taxi Dainik Gomantak
गोवा

Arambol: विदेशी पर्यटकांमुळे स्‍थानिक टॅक्सीचालकांचा व्‍यवसाय धोक्यात! किनारी भागातील वाढता प्रकार

Goa Taxi Issues: किनारी भागात पर्यटन हंगामाच्या प्रारंभापासूनच अनेक विपरीत घटना घडत असल्‍याने अगोदरच असलेल्‍या समस्‍यांमध्‍ये आणखी भर पडत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tourism season foreign tourists taxi business local drivers

हरमल: येथील किनारी भागात पर्यटन हंगामाच्या प्रारंभापासूनच अनेक विपरीत घटना घडत असल्‍याने अगोदरच असलेल्‍या समस्‍यांमध्‍ये आणखी भर पडत आहे. आता तर विदेशी पर्यटक बेकायदा टॅक्‍सीव्‍यवसाय करू लागल्‍याने स्‍थानिक टॅक्सीचालकांचा व्‍यवसाय धोक्यात आला आहे.

काल सकाळी दहाच्या सुमारास खालचावाडा-हरमल येथे एक विदेशी पर्यटक खासगी टॅक्सी (जीए ०३ झेड ६९५४) घेऊन आला व दोन विदेशी पर्यटकांना घेऊन जाऊ लागला. त्यावेळी स्थानिक टॅक्सीव्यावसायिकांनी हरकत घेतली व त्यास बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र एक-दोन शब्दांशिवाय त्‍याने काहीच भाष्य केले नाही. मात्र ही भाड्याची टॅक्सी असल्याचे नंतर स्‍पष्‍ट झाले.

पोलिसांना कळविल्‍यानंतर टॅक्सी ताब्यात घेतली जाते व दंडात्मक कारवाईनंतर सोडून दिली जाते. विदेशींना भाडेपट्टीवर वाहन देणे व त्या पर्यटकांनी भाडी मारणे या खूप मोठा फरक आहे. पोलिसांनी अशा पर्यटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी टॅक्सीचालकांनी केली आहे.

सरकारचे वाहतूक धोरण कुचकामी

सरकारचे वाहतूक खाते ‘रेंट अ बाईक’ योजनेअंतर्गत नवीन परवाने देत नाही व स्थानिकांनी खासगी दुचाकी भाडेपट्टीवर दिल्यास त्यांना दहा हजार रुपये दंड ठोठावले. वाहतूक परवाने दिल्यास सरकारला लाखोंचा महसूल मिळू शकतो व स्थानिकांना उदरनिर्वाह मिळू शकतो, असे मत हरमलमधील एक टॅक्‍सीव्‍यावसायिक गुरुनाथ नाईक यांनी व्‍यक्त केले. प्रत्यक्षात दुचाकींबाबत ठोस धोरण अमलात आणण्याची गरज आहे, असेही ते म्‍हणाले. वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कडक कारवाई करावी व स्थानिक टॅक्सीव्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्‍यांनी केली आहे.

आठवड्यात तिसऱ्यांदा घडला प्रकार

गेल्या आठवड्यात सलग तिसऱ्यांदा असा प्रकार घडल्‍याने टॅक्सीव्यावसायिकांनी संताप व्यक्त केला आहे. विदेशी पर्यटकांनी रशियन भाषेच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू ठेवल्याने स्थानिक टॅक्सीव्यावसायिकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे, असे टॅक्सीमालक प्रवीण वायंगणकर यांनी सांगितले. रशियन भाषेतील जाहिरातबाजी पोस्टर्समुळे टॅक्सीसह अन्य व्यवसायांना धोका निर्माण झाला आहे, असेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

चेहऱ्यावर थकवा, शब्द अडखळले; दिल्लीत उपचार घेऊन परतलेल्या मंत्री सिक्वेरांनी शांतपणे LOP युरींना दिले उत्तर

IND vs ENG: मोहम्मद सिराजची कमाल! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा ठरला 25वा भारतीय

IND vs ENG: प्रसिद्ध कृष्णा अन् जो रुटमध्ये जोरदार बाचाबाची! मैदानावर घडला हाय व्होल्टेज ड्रामा; अंपायरला करावी लागली मध्यस्थी VIDEO

Mahadevi: वनतारा 'महादेवी'ला परत करण्यास तयार? माहिती देऊन कोल्हापूरच्या खासदाराने 10 मनिटांतच पोस्ट केली Delete

Goa Assembly: टोंका येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची स्थिती बिकट, जेनिफर मोन्सेरात यांनी वेधलं सरकारचं लक्ष; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT