Tourism in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: परदेशी पावलं गोव्याच्या दिशेने वळणार; यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार

Tourism in Goa: गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पर्यटन हंगामात विदेशी पर्यटक पुन्हा गोव्याकडे वळणार

गोमन्तक डिजिटल टीम

World Tourism Day

प्रसाद सावंत

तिसवाडी, ता. २६ : कोविड-१९ महामारीनंतर यंदा विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उझबेकिस्तान, कझाकिस्तान, पोलंड, रशिया, यूके या देशांतून पर्यटक मोठ्या संख्येत राज्यात येण्याचे संकेत मिळत असल्याने गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पर्यटन हंगामात विदेशी पर्यटक पुन्हा गोव्याकडे वळणार, अशी आशा पर्यटन उद्योगात वावरणाऱ्या अनेकांना आहे.

गोवा पर्यटन खात्याकडून पुनरुत्पादन पर्यटन धोरणांतर्गत पर्यावरणपूरक, महिला सशक्तीकरण आणि ग्रामीण भागातील गोवा पर्यटकांना अनुभवता येईल, असे उपक्रम निर्माण केले आहेत. त्यासाठी ‘होम स्टे’सारखी कल्पना लागू केली जाईल, ज्यात पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांपलीकडे असलेला गोवा, येथील खाद्यपदार्थ, लोकसंस्कृती पाहायला मिळणार आहे. परंतु या सगळ्यासाठी साधन सुविधा आवश्यक असून काही प्रमाणात काम केले गेले आहे.

दोन विमानतळ, महामार्ग, पूल असे प्रकल्प केले जात आहेत, तसेच सार्वजनिक वाहतूक प्रणाली व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलल्याचे दिसते, असे अनेकांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त पर्यटन खात्याने आध्यात्मिक पर्यटनासाठी ‘एकादशी तीर्थ’ उपक्रम सुरू केला आहे.

कोविड-१९ महामारीनंतर शॅकमालकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. सरकारकडून त्यांना थोड्या प्रमाणात मदत करण्यात आली होती, त्यात गेल्या वर्षी शॅक परवाने देण्यात विलंब झाल्याने हंगाम चांगला गेला नव्हता. परंतु यंदा परवाने वेळेत दिले गेल्याने हंगाम चांगला होण्याची शक्यता आहे. त्यात विदेशी पर्यटकांमध्ये वाढ अपेक्षित आहे. परंतु मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर दक्षिण गोव्यातील पर्यटनाला फटका बसला आहे, यात काही वाद नाही.

- क्रुझ कार्दोज, अध्यक्ष (गोवा शॅक मालक कल्याण सोसायटी)

गोव्यात विदेशी पर्यटकांच्या तुलनेत देशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. कोविड-१९ महामारीनंतर आता विदेशी पर्यटकांची संख्या पूर्ववत होण्याच्या दिशेने जात आहे. त्याशिवाय राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही चांगली होण्याची गरज आहे. पणजीत ई-बसेस सुरू करण्याचा निर्णय हा योग्य आहे.

- जॅक सुखिजा (अध्यक्ष, टीटीएजी)

पर्यटन उद्योगात प्रगती करायची असेल, तर स्पर्धा होणे आवश्यक आहे. त्यासाठी जास्तच जास्त घटक मैदानात असल्याने स्पर्धा होणार आणि याचा थेट फायदा पर्यटनाला होईल. गोवा माईल्स, गोवा टॅक्सीसारख्या ॲपआधारित सेवा सुरू होण्याची गरज आहे.

- नीलेश शहा (उद्योजक,टीटीएजी)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: यॉर्कर किंगचा नवा कारनामा! मलिंगाचा रेकॉर्ड मोडत बुमराह ठरला 'बोल्ड'चा बादशाह; द. आफ्रिकेविरुद्ध केली कमाल VIDEO

VIDEO: जस्सी 'जैसा' कोई नही! क्विंटन डिकॉकला केलं चारीमुंड्या चित, धाकड गोलंदाजीनं केलं क्लीन बोल्ड; व्हिडिओ व्हायरल

सत्तरीत अवकाळी पावसाचा तडाखा! अचानक कोसळलेल्या सरींनी काजू उत्पादकांचे धाबे दणाणले; उत्पादन घटण्याची भीती

T20 WC 2026: टीम इंडियासाठी 'करो या मरो'! सेमीफायनल गाठण्यासाठी कसं आहे समीकरण? भारताचा हा 'मास्टर प्लॅन'; पाहा संपूर्ण रोडमॅप

Holi 2026 Horoscope: होळीला ग्रहांचं महामिलन! शुक्र-शनीची युती देणार छप्परफाड धनलाभ, रखडलेली कामं होणार पूर्ण; वैवाहिक जीवनातही नांदणार सुख

SCROLL FOR NEXT