Foreign liquor seizure Dainik Gomantak
गोवा

Liquor Seizure: हरियाणातून आलेला कोट्यवधींचा मद्यसाठा जप्त! आयातीमागील 'खरा' सूत्रधार शोधा! व्यापारी संघटनेची मागणी

Foreign liquor seizure: म्हापशातील रमेश वाईन्सचा मालक साईश सावंत या अधिकृत विक्रेत्यास ३० एप्रिलला गुजरात पोलिस गोव्यात येऊन पकडून घेऊन गेले.

Sameer Panditrao

पणजी: हरियाणातून आलेला विदेशी बनावटीचा कोट्यवधींचा मद्यसाठा गोव्यात पकडला गेला. गोव्यात एकाच घाऊक वितरकाकडून विदेशी बनावटीचे मद्य सर्व विक्रेते घेतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्य आयातीमागील खरा सूत्रधार कोण, हे अबकारी खात्याने शोधावे, अशी मागणी गोवा मद्य व्यापारी संघटनेने केली आहे.

याबाबतचे निवेदन संघटनेतर्फे आज अबकारी आयुक्त एस. एस. गिल यांना देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पत्रादेवी तपासणी नाक्यावर अबकारी अधिकाऱ्यांनी गोव्यात येणारा परदेशी बनावटीचे मद्याचा ट्रक पकडला होता. या परदेशी बनावटीच्या मद्याचे मुख्य वितरक गोव्यातील घाऊक विक्रीचे अधिकार ‘रॉयल लिक्विड’चे मालक प्रितेश देसाई यांच्या एकमेव कंपनीकडे आहेत.

म्हापशातील रमेश वाईन्सचा मालक साईश सावंत या अधिकृत विक्रेत्यास ३० एप्रिलला गुजरात पोलिस गोव्यात येऊन पकडून घेऊन गेले. २०२३ मध्ये गुजरातमध्ये ज्याच्याकडे मद्यसाठा सापडला त्याने या वाईन्सच्या मालकाचे नाव सांगितले होते.

पकडून घेऊन जाण्यापूर्वी सावंत यास पोलिसांनी कोणतीही कारणे दाखवा नोटीस पाठवली नाही. त्यामुळे असा प्रकार येथील विक्रेत्यांबाबत होऊ नये, तसेच गुजरात पोलिसांनी केलेल्या अवैध कारवाईबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात आल्याचे दत्तप्रसाद नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT