goa job fraud Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: परदेशात भरपूर पगाराची नोकरी देण्याचे आमिष; गोव्यातील तरुणीची 2 लाखांची फसवणूक

Foreign Job Scam Goa: विश्वास संपादन करून दोन महिन्यांच्या कालावधीत फसवणूक करण्यात आली

Akshata Chhatre

पणजी: जास्ती पैशांचे आमिष दाखवून नोकरीच्या घोटाळ्यात एका तरुणीची सुमारे २ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. एखाद्या उत्तम नोकरीच्या शोधात असताना तिचा विश्वास संपादन करून दोन महिन्यांच्या कालावधीत तिची फसवणूक करण्यात आली.

सायबर क्राईम एसपी राहुल गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, घोटाळा डिसेंबर २०२४ मध्ये सुरू झाला जेव्हा पीडित, सक्रियपणे नोकरीच्या शोधात होती.

बहरीनमधील ऑटोमोबाईल कंपनीत भरती होत असल्याचा दावा करणाऱ्या एका माणसाचा तिला फोन आला आणि त्या माणसाने पीडित मुलीला कंपनीकडून मिळणाऱ्या रहाण्याच्या व्यवस्थेसह सेल्स कन्सलटंट म्हणून ९०,००० रुपये मासिक पगारचे आश्वासन दिले, ही ऑफर पीडितेला देखील रुचली आणि याचमुळे तिची फसवणूक झाली.

फसवणूक करणाऱ्या माणसाने तिला वेळोवेळी पैसे भरायला सांगितले. सुरुवातीला, पीडितेला नोंदणी, विमा, वैद्यकीय आणि इतर प्रशासकीय शुल्कासाठी ८०,००० रुपये भरण्यास सांगितले होते, जे काही हफ्त्यांमध्ये विभागलेले होते. फसवणूक करणाऱ्या माणसाच्या सांगण्यानुसार पीडितेने आधी १५,००० रुपये ऑनलाइन त्यानंतर सीपीआर कार्डसाठी ६,००० रुपये आणि शेवटी एलआरएमए नोंदणी प्रमाणपत्र, विमा आणि वैद्यकीय खर्चासाठी ३०,००० रुपये दिले होते.

सुरुवातीचे ८०,००० रुपये दिल्यानंतर, फसवणूक करणाऱ्याने तिकीट बुकिंग आणि व्हिसा प्रक्रियेसाठी अतिरिक्त निधीची मागणी करायला सुरुवात केली. हळूहळू पीडित मुलीला यावर संशय येऊ लागताच तिने पैसे पुन्हा मागू पहिले आणि त्याचवेळी फावणूक करणाऱ्या व्यक्तीकडून तिला धमकावण्यात आलं. पैसे न दिल्यास पूर्वीचे पैसे परत मिळणार नाही अशी धमकी येताच तरुणीने आणखीन ३३ हजार रुपये देऊ केले.

हा घोटाळा जसजसा वाढत गेला तसतशी पैशाची मागणी वाढत गेली. पीडित महिलेने दिलेली रक्कम अपुरी पडत असल्याने आणखीन रक्कम देण्यासाठी तिला प्रवृत्त करण्यात आलं. घोटाळेबाजाने नोकरी मिळवण्यासाठी अर्धी अतिरिक्त रक्कम स्वत: भरण्याची ऑफर दिली, आणि इथे देखील तरुणीने ३८,००० रुपये गमावले. या घोटाळ्यात पीडितेचे सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT