Colva police Station News, Colva Police News Updates, Goa Police news updates Dainik Gomantak
गोवा

कोलवा पोलीस स्थानकासाठी जागेचा शोध सुरु

कोलवा पोलिस स्थानकाचे कार्यक्षेत्र सासष्टीतील समुद्र किनारी भागात

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गेल्या दहा वर्षांपासून कोलवा पोलिस स्थानक कोलवा येथील एका जुन्या घरात कार्यरत आहे. हे घर पुष्कळ जुने आहे. त्याचे दरवाजे मोठे आहेत. खिडक्यांना, दरवाजांना लोखंडी ग्रील्सही नाही. तसेच या इमारतीला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे या पोलिस स्थानकासाठी संबंधित खाते जागेच्या शोधात आहे.

कोलवा पोलिस स्थानकाचे कार्यक्षेत्र सासष्टीतील समुद्र किनारी भागात आहे. नऊ वर्षांपूर्वी याच पोलिस स्थानकात हाणामारीचा प्रकार घडला होता. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली होती. तेव्हाच्या जिल्हाधिकारी संध्या कामत यांनी आपल्या अहवालात, ही जागा पोलिस स्थानकासाठी सुरक्षित नाही, असा शेरा मारला होता.(Colva Police News Updates)

पर्यटन खात्याच्या भूखंडाचे काय झाले?

मध्यंतरी कायतू सिल्वा आमदार होते, तेव्हा सरकारकडे पोलिस स्थानक इमारतीसाठी मागणी केली होती. तसेच पोलिस खात्याने सरकारला पर्यटन खात्याच्या अंदाजे 2500 चौरस मीटर भूखंडासाठी प्रस्ताव सादर केला होता. मात्र, नंतर काहीच निष्पन्न झाले नाही. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना कोलवा पोलिस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो यांनी सांगितले, की पर्यटन खात्याच्या भूखंडासंदर्भात काहीच निर्णय झालेला नाही. पोलिस खाते कोलवाच्या आसपास पोलिस स्थानकासाठी जागेच्या शोधात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Robotic Surgery: कमी वेदना, जलद रिकव्हरी! रोबोटिक सर्जरी म्हणजे काय? नॉर्मल ऑपरेशनपेक्षा किती वेगळी? जाणून घ्या वैद्यकीय तज्ज्ञांकडून

SCROLL FOR NEXT