Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

Ponda Municipality: फोंड्यात निवडणुकीचे लागले वेध; इच्छुक उमेदवार रिंगणात उतरण्याच्या तयारीत

Ponda Municipality: फोंडा नगरपालिका निवडणुका आता केवळ चार महिन्यांवर असून निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Ponda Municipality: फोंडा नगरपालिका निवडणुका आता केवळ चार महिन्यांवर असून निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. अनेक इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. यंदाची निवडणूक रंगतदार होणार असे संकेत मिळत आहेत.

सध्याचे बरेच नगरसेवक परत एकदा बोहल्यावर चढण्याच्या तयारीला लागले असून ते आपले प्रगती पुस्तक घेऊन मतदारांचे उंबरठे झिजवताना दिसत आहेत. पण यावेळीही प्रभागाची संख्या वाढणार असे संकेत मिळायला लागले आहेत.

दरम्यान, तसे झाल्यास सगळे प्रभाग ‘उलटे पुलटे’ होऊ शकतात. आणि मग त्यातून काही जणांची पत्ते कट होऊ शकतात. सध्या रवी नाईक भाजपचे आमदार तथा मंत्री असल्यामुळे चेंडू त्यांच्या रिंगणात असणार यात संदेह नाही. त्यांनीही आपले पॅनल रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली असून काही उमेदवारही निश्‍चित केले असल्याचे समजते.

काँग्रेसतर्फे फोंडा मतदारसंघाचे काँग्रेसचे मागच्या निवडणुकीतील उमेदवार राजेश वेरेकर हे आपले काही उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे कळते. काही नगरसेवकांच्या विरोधात हवा वाहत असल्याचे मतदारांचा कानोसा घेतल्यावर दिसून आले आहे. त्यामुळे बहुतेक प्रभागात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे.

भाटीकर सक्रिय

सरकारात मगो व भाजपची युती असल्यामुळे मगो पक्ष थेटपणे रिंगणात उतरण्याची शक्यता नसली तरी डॉ. केतन भाटीकर सक्रिय असून ते ''रायझिंग फोंडातर्फे'' नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उतरण्याची दाट शक्यता दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT