Ravi Naik Dainik Gomantak
गोवा

फोंड्याचे कॉंग्रेस आमदार रवी नाईकांचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार रवि नाईक यांनी आज भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला.

दैनिक गोमन्तक

गोव्यात विधानसभा निवडणुकांचे (goa Assembly elections) वारे वाहू लागले आहेत. याच पाश्वभूीवर अनेक बडे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करु लागले आहेत. सध्या केंद्रात आणि राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपमध्ये सगळ्यानांच प्रवेश करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेते भाजपची वाट धरु लागले आहेत. तर दुसरीकडे शुक्रवारी गोवा फॉरवर्डचे (Goa forward party) नेते जयेश साळगावकर (Jayesh Salgaonkar) यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपची वाट धरली आहे. आणि यातच फोड्यांचे कॉंग्रेस आमदार रवी नाईक (Fonda MLA Ravi Naik) यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे निवडणूक प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार रवि नाईक यांनी आज भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी त्यांना सदस्यत्वाची पावती दिली. तर मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले यावेळी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर आमदार दयानंद सोपटे खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते

रवींचा होता दोन दगडांवर पाय!

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांच्या मुलानी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते फक्त काँग्रेसमध्ये ‘टेक्निकली’ होते. दोन दगडावर पाय ठेवून ते होते, त्यामुळे त्यांना गेले दीड वर्ष काँग्रेसने पूर्ण मोकळे सोडले होते. त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांनाही बोलावण्यात येत नव्हते. काँग्रेसने फोंड्यामध्ये नवे नेतृत्व उभे केल्यानेच उमेदवार निवडीसंदर्भातच्या प्रक्रियेत पक्षाच्या गट समितीने त्यांचे नाव पाठविले नाही. पक्षावर ज्या आमदारांची निष्ठा नाही ते पक्षात नसलेले बरे. दुटप्पी धोरण असलेल्या नेत्यांना बाहेर ठेवून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नाईक यांच्या पक्षाच्या राजीनाम्यावर व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT