Focus on rural development says MLA Michael Lobo Dainik Gomantak
गोवा

MLA Michael Lobo: ग्रामीण भागाच्या विकासावर भर द्या

MLA Michael Lobo: ‘विद्याप्रबोधिनी’ आयोजित लोकप्रतिनिधी संमेलनात प्रतिपादन

दैनिक गोमन्तक

MLA Michael Lobo: राज्याला शहरी तोंडवळा असला तरी ग्रामीण आणि निमशहरी भागही बऱ्यापैकी आहे. पंचायत सदस्य आणि सरपंचांनी या भागाच्या विकासावर म्हणजे त्या भागात राहणाऱ्या जनतेच्या विकासावर भर दिला पाहिजे, असे आवाहन आमदार मायकल लोबो यांनी शनिवारी (ता.१४) पर्वरी येथे केले.

विद्याप्रबोधिनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या लोकप्रतिनिधी संमेलनात ते बोलत होते. या संमेलनाला पर्यटनमंत्री रोहन खंवटे, साळगावचे आमदार केदार नाईक, हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा उपस्थित नव्हते. यावेळी मंचावर पंचायतींचे प्रतिनिधी, प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर, राजेंद्र भोबे, श्रीहरी आठल्ये, उल्हास अस्नोडकर उपस्थित होते.

दिव्या चारी यांच्या ईशस्तवनाने संमेलनास सुरवात झाली. प्राचार्य भूषण भावे यांनी प्रास्ताविक केले. संजय वालावलकर यांनी प्रबोधन संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजक स्वप्नील गावकर यांनी कार्यक्रमाचा हेतू विषद केला. पाहुण्यांची ओळख हेमा सावंत, आशय नाईक, प्रा. वर्षा इंगळहली यांनी करून दिली. मेळाव्यातील मार्गदर्शकांना संजय वालावलकर यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

संमेलनात अरुण भट (टी.जे.एस.बी.), मविंसी लकाहरिया (एस.बी.आई.), पी. डी. आंबोटकर (खादी ग्रामोद्योग), नकुळ बेंद्रे (एल.आई.सी.), अविनाश शिंदे (आर.बी.आई.), एन. बोंमास्वामी (वैज्ञानिक), विश्वास कदम (नाबार्ड) यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रज्ञा तारी यांनी, तर आभारप्रदर्शन प्रा. अरुण गवस यांनी केले.

गावात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचा उत्कर्ष साधणे हे ग्रामपंचायत सदस्याचे ध्येय असले पाहिजे. सुमारे 100 वर्षांअगोदर महात्मा गांधी यांनी दिलेला ‘खेड्यांमध्ये चला’ हा संदेश आजही योग्य असाच आहे. ‘स्वराज्य ते सुराज्य’ हा प्रवास गावांच्या विकासातून साध्य होऊ शकतो. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणे हे प्रत्येक प्रतिनिधीचे कर्तव्य असले पाहिजे. -
मायकल लोबो, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

SCROLL FOR NEXT