Bicholim Rain Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : डिचोलीत पुन्‍हा पूरसदृश स्थिती; लोकांमध्‍ये भीती

Bicholim News : झाडांची पडझड : नद्यांनी ओलांडली धोक्‍याची पातळी; स्‍थिती नियंत्रणात

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली, पावसाने पुन्हा जोर धरला असून, आज दिवसभर रौद्रावतार धारण करून डिचोली आणि परिसराला झोडपून काढले. त्‍यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले.

नदी-नाल्यांतील पाणी पुन्हा वाढले असून, डिचोलीसह अस्नोड्यातील पार नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. आज रविवारी दुपारी तर नद्यांतील पाणी बाहेर आल्‍याने पूरसदृश स्‍थिती निर्माण झाली होती.

डिचोली आणि परिसरातील सकल भागात पुन्हा जलमय स्थिती निर्माण झाली आहे. व्हावटी येथे नदीतील पाणी तीरावरील कुळागारांनी घुसले. बागवाडा-पिळगाव आदी काही भागातही पाणी घरादारांपर्यंत पोचले. रस्ते पाण्याखाली गेले. जलमय स्थिती निर्माण झाली असली, तरी सायंकाळपर्यंत स्थिती पूर्णपणे नियंत्रणात होती.

आजच्या पावसामुळे दिवसभर विविध ठिकाणी झाडांची पडझड झाली. पैरा येथे घरावर झाड पडून मोडतोड झाली.

आपत्‍कालीन यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर

आठवड्यापूर्वी म्हणजेच गेल्या रविवारी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर डिचोलीतील बहुतांश भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. डिचोली शहर तर पुराच्या वेढ्यात अडकले होते. मात्र पावसाचा जोर कमी होऊन पाणी ओसरल्याने पुराचे संकट टळले व लोकांनी सुटकेचा श्‍‍वास सोडला.

आता पुन्‍हा एकदा पावसाचा जोर वाढल्‍याने लोक पुन्हा भयभीत बनले आहेत. पावसाचा जोर वाढल्याने आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा पुन्हा अलर्ट झाली आहे. मात्र सायंकाळपर्यंत डिचोलीत परिस्थिती नियंत्रणात होती, अशी माहिती आपत्कालीन विभागाने दिली. सायंकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

SCROLL FOR NEXT