Flights To Goa Dainik Gomantak
गोवा

Flights To Goa: आणखी एका शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होणार; 2 कंपन्या रांगेत

देशातील विविध शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू केली जात आहे.

Pramod Yadav

Flights To Goa: गोव्यात दोन्ही विमानतळ सध्या सुसाट सुरू आहेत. देशातील विविध शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू केली जात आहे. इंडिगो, स्पाईसजेट, एअर इंडिया, अकासा यासारख्या कंपन्या विविध शहरे आणि गोवा अशी थेट कनेक्टेव्हिटी सुविधा निर्माण करत आहेत.

त्यातच आता पंजाब, जालंधरच्या आदमपूर विमानतळावरून गोव्यासह विविध शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे. नुकतेच आदमपूर विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 110 कोटी रुपये खर्चून जालंधरच्या आदमपूर विमानतळाचे नवीन टर्मिनल उभारण्याचे काम सुरु आहे. येथून तीन वर्षांनंतर पुन्हा उड्डाणे सुरू होणार आहेत. नुकतेच नवनियुक्त लोकसभा खासदार सुशील रिंकू यांनी भेट देऊन कामाला गती देण्यास सांगितले.

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाने बेंगळुरू, गोवा, कोलकाता, नांदेड येथे थेट विमानसेवा सुरू करण्यास ग्रीन सिग्नल दिला आहे. स्पाईसजेट आणि स्टार एअर एअरलाइन्स कंपन्यांनी आदमपूरहून विमान उड्डाणासाठी निविदा काढल्या आहेत.

आदमपूर विमानतळावरून 1 मे 2018 रोजी दिल्ली-आदमपूर-दिल्ली सेक्टरचे पहिले नागरी उड्डाण येथून सुरू झाले. 2018 मध्ये तात्पुरते बांधलेले बहुतांश सिव्हिल टर्मिनल फायबर, प्लायवूड आणि लोखंडी पत्र्यांचे होते. हे टर्मिनल नवीन इमारतीत स्थलांतरित केले जाणार होते जे मार्च 2020 मध्येच पूर्ण होतील असे सांगितले जात होते.

दरम्यान, नवीन इमारतीच्या बांधकामाला विलंब झाला आणि 2023 मध्ये टर्मिनल तयार झाले. मात्र, टॅक्सी ट्रॅकचे बांधकाम सुरू असल्याने ते कार्यान्वित झालेले नाही. येथून स्पाईस जेटचे विमान नवी दिल्लीपर्यंत धावत असले तरी ही सेवा तीन वर्षांपासून बंद होती. आता नवीन टर्मिनल तयार आहे आणि येथून लवकरच उड्डाणे सुरू होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: नोकरी आणि व्यवसायात होणार पैशांचा महापूर! मंगळाचे रोहिणी नक्षत्रात गोचर; 24 जुलैपर्यंतचा काळ 'या' राशींसाठी ठरणार वरदान

New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Calangute Crime News: कळंगुटमध्ये क्राईम ब्रँचची मोठी कारवाई! देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, तेलंगणाच्या एकाला अटक तर पीडित महिलेची सुटका

Income Tax New Rules: आयकर भरण्याची कटकट संपली! करदात्यांना सरकारकडून सर्वात मोठी भेट; ITR-1 चा बदलला नियम

Retirement Life: निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नवी सुरुवात! अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT