Flight Fare Raised Dainik Gomantak
गोवा

Flight Fare Raised: दिवाळीनंतर विमान प्रवासभाड्यात मोठी वाढ, प्रवाशांचं दिवाळं

गोव्यातून मुंबईला विमानाचे प्रवासभाडे साडे तीन हजारांपासून ते 8 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.

Pramod Yadav

Flight Fare Raised: दिवाळीनंतर विमान भाड्यात 50 ते 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात लोक महानगरांत प्रवास करत आहेत. विमानातून प्रवास करण्याकडे अलिकडे जास्त कल वाढला असून, प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

गोव्यातून मुंबईला विमानाचे प्रवासभाडे साडे तीन हजारांपासून ते 8 हजार रुपयांपर्यंत वाढले आहे.

गोवा ते मुंबई विमान प्रवासचे भाडे ऑनलाईन तपासले असता ते 6,772 ते 8,052 रुपयांपर्यंत वाढले आहे. याशिवाय छत्तीसगडमधील स्वामी विवेकानंद विमानतळ ते दिल्ली आणि गोव्याला जाण्याचे विमान भाडे सर्वाधिक आहे.

रायपूरच्या स्वामी विवेकानंद विमानतळ येथून सध्या दिल्लीचे भाडे 11400 ते 19900 रुपये आणि परतीचे भाडे 4400 ते 7000 रुपये आहे. त्याचप्रमाणे गोव्याचे भाडे 19300 ते 19500 रुपये आणि परतीचे भाडे 4800 ते 4900 रुपये आहे.

पण, अहमदाबादचे भाडे 12900 ते 14500 रुपये आणि परतीचे भाडे 11900 ते 13500 रुपये आहे. तर इतर मोठ्या शहरांमधील भाडे सामान्य पातळीवर आहे.

स्वामी विवेकानंद विमानतळ रायपूर ते दिल्ली पर्यंत जास्तीत जास्त 6 उड्डाणे चालवली जातात. 2 विस्तारा आणि 4 इंडिगो उड्डाणे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Stunt Viral: रिलच्या नादात 'बाहुबली' स्टंट अंगाशी; चालत्या वाहनाच्या छतावर उभे तिघे अचानक कोसळले, एक गंभीर जखमी

Smriti Mandhana Record: एशियन गेम्सच्या महामुकाबल्यात स्मृती मानधानाचा विश्वविक्रम! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11,000 धावा करणारी ठरली पहिलीच महिला फलंदाज

Viral News: कायद्याचं शिक्षण घेतलं, पण करिअर निवडलं कुत्रे फिरवण्याचं; दिवसाला कमावते तब्बल 50 हजार, वाचा तरूणीची अनोखी स्टोरी

संपादकीय: राजकीय हस्तक्षेपाचा अभियंत्यांना फटका

'बॉयफ्रेंड असू दे, पण त्याच्यासोबत लग्न नको'; प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलीला अजब सल्ला! स्वतः मात्र लहान वयात अडकली होती विवाहबंधनात

SCROLL FOR NEXT